शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लहामेवाडीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST

माजलगाव : सतत मानसिक त्रास देत मारहाण करून अपमानित केल्याने परडी माटेगाव येथील २६ वर्षीय युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास ...

माजलगाव : सतत मानसिक त्रास देत मारहाण करून अपमानित केल्याने परडी माटेगाव येथील २६ वर्षीय युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील लहामेवाडी शिवारात रविवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्‍यातील लहामेवाडी शिवारात रविवारी पांडुरंग धपाटे व महारूद्र साडेगावकर यांच्या सामाईक बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला एका तरुणाचे शरीर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान, गळफास घेतलेल्या तरुणाच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली. तालुक्यातील लऊळ क्रमांक १ येथील नामदेव हनुमान नायबळ व वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील भाऊसाहेब अंकुश पवार हे मला सतत मानसिक त्रास देत होते. मला शिवीगाळ करून मारहाण केल्याने मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस या दोघांना जबाबदार धरण्यात यावे, असे चिठ्ठीत नमूद होते. या वेळी पोलिसांना मयत युवक हा परडी माटेगाव येथील शहादेव भाऊराव पवार असल्याचे त्याच्या आधारकार्डवरून दिसून आले. मयताचा मावसभाऊ गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामदेव हनुमान नायबळ व भाऊसाहेब अंकुश पवार यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स. पोलीस निरीक्षक नीलेश इधाते करत आहेत.