शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कैद्याचा दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:22 IST

अत्याचाराच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदिवान असलेल्या कैद्याने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास शौचालयात जाऊन हातावर काचेने जखमा करून या कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देबीड जिल्हा कारागृहात घटना : बलात्काराच्या गुन्ह्यातील बंदिवान

बीड : अत्याचाराच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदिवान असलेल्या कैद्याने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास शौचालयात जाऊन हातावर काचेने जखमा करून या कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पप्पू विश्वनाथ झिंजुर्डे (वय २३ वर्षे रा. नाळवंडी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कैद्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षण भिंतीवर लावलेल्या काचा खाली पडल्या होत्या. त्याच काचा उचलून कैदी झिंजुर्डे हा शौचालयात गेला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्याने हातावर काचाने जखमा करून आत्महत्येचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे जखमा केल्यानंतर तो स्वत: बाहेर आला आणि आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यानंतर कारागृह प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. त्याला तात्काळ बंदोबस्तात जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.रात्रभर उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात बंदिस्त करण्यात आले. त्याने असा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे केला, हे मात्र समजू शकले नाही.याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारागृह अधीक्षक एम.एस.पवार, कारागृह निरीक्षक संजय कांबळे यांनी तात्काळ याबाबत उपाययोजना केल्या आहेत.संरक्षण भिंतीवरील काचा खाली पडणार नाहीत, आणि पडल्या तर ते तात्काळ उचलल्या जातील, यासाठी सूचना केल्या आहेत.पंधरवड्यातील तिसरी घटना : दुसरा अयशस्वी प्रयत्नदरम्यान, मागील पंधरा दिवसांत तीन कैद्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.या यातील एक कैदी हा अट्टल गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले.सर्वांनीच हातावर काचेने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.पप्पू याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तो कारागृहात बंदिस्त आहे. कारागृहात आल्यापासून तो मानसिकदृष्ट्या खचला असल्याचे समजते. त्यामुळेच त्याने यापूर्वी २८ फेब्रुवारीला आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :BeedबीडPrisonतुरुंगSuicideआत्महत्या