शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:07 IST

बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी रोज नवनवे गैरव्यवहार करताना आढळून येत आहेत. असाच एक प्रकार सोमवारी आष्टीत उघडकीस आला. दुस-याच्या जागेवर बसून परीक्षा देणाºया तोतया विद्यार्थ्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून जिल्ह्यात आजही परीक्षा केंद्रांमध्ये गैरप्रकार चालत असल्याचे उघड झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी रोज नवनवे गैरव्यवहार करताना आढळून येत आहेत. असाच एक प्रकार सोमवारी आष्टीत उघडकीस आला. दुसºयाच्या जागेवर बसून परीक्षा देणाºया तोतया विद्यार्थ्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून जिल्ह्यात आजही परीक्षा केंद्रांमध्ये गैरप्रकार चालत असल्याचे उघड झाले आहे.

२६ फेब्रुवारी सकाळी ११ ते २ या वेळेत भौतिकशास्त्र या विषयाचा पेपर होता. आष्टी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील हॉल क्र. दोनमध्ये सहशिक्षिका शोभा गंगाधर नरोटे या पर्यवेक्षक म्हणून होत्या. या हॉलमध्ये एकूण २५ परीक्षार्थी होते. परीक्षार्थींची हजेरी नोंदवून स्वाक्षरी घेत असताना नरोटे यांना प्रवीण त्रिंबक भांडवलकर या परीक्षार्थीच्या नावाने दुसराच एक तोतया परीक्षार्थी प्रविण अशोक पौळे (रा. चापडगाव, ता. कर्जत जि. अहमदनगर) हा बसल्याचे आढळून आले.

त्याची सखोल चौकशी केल्यानंतर तो तोतया असल्याची खात्री नरोटे यांना पटली. त्यांनी ताबडतोब ही माहिती केंद्र संचालिका सुलोचना सोनदे यांच्या कानावर घातली. त्यानंतर सदरील तोतया परीक्षार्थीकडून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हस्तगत करण्यात येऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

याप्रकरणी, पर्यवेक्षिका शोभा गंगाधर नरोटे यांच्या फिर्यादीवरून बोगस परीक्षार्थी प्रविण अशोक पौळ आणि त्याला प्रोत्साहन देऊन सहकार्य करणारा प्रवीण त्रिंबक भांडवलकर या दोघांवर महाराष्ट्र गैरव्यावहार अधिनियमच्या कलम ७ अन्वये आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

तोतया नगर जिल्ह्यातीलतोतया विद्यार्थी हा अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले. त्याची सखोल चौकशी केली तो तोतया असल्याचे पर्यवेक्षिका नरोटे यांच्या लक्षात आल्यानंतर ही माहिती केंद्र संचालकाच्या कानावर घातली.