बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहा दिवस कडक लाॅकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा चार दिवसांपासून किराणा, दूध व मेडिकल वगळता सर्व काही बंदचे आदेश दिले होते. त्याच आदेशात शनिवार व रविवार असे दोन दिवस मेडिकल व दवाखाने वगळता सर्व काही बंदचे आदेश असल्याने शनिवारी पहिल्याच दिवशी शहरातील व ग्रामीण भागातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून येथील व्यापारी बांधवांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ग्रामीण भागातील मादळमोही, तलवाडा, जातेगाव, उमापूर, धोंडराई, चकलांबा, पाडळसिंगीसह विविध ठिकाणच्या व्यापारी पेठा कडकडीत बंद होत्या.
===Photopath===
100421\20210410_100715_14.jpg