शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या जीवांवर सुरी चालवणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 08:25 IST

beed News: ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन  मुक्या जनावरांची कत्तल कायमची बंद करण्याचा ठराव आष्टी तालुक्यातील खडकत ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचणार आहेत.

 कडा (जि. बीड) -  विनापरवाना सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर पोलिस प्रशासनाने वारंवार कारवाया केल्या. कत्तलखाने उद्ध्वस्त केले, त्यानंतर सील केले, तरीही जनावरांची कत्तल थांबली नाही. शेवटी ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन  मुक्या जनावरांची कत्तल कायमची बंद करण्याचा ठराव आष्टी तालुक्यातील खडकत ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचणार आहेत. 

गावकऱ्यांनी सर्व बेकायदेशीर कत्तल थांबवावी. नागरिकांच्या भावना दुखविल्या जाणार नाही याचा सर्व विचार करून गावातील कत्तलखाने बंद करावेत यासाठी ग्रामपंचायतीने २३ जानेवारी रोजी एकमुखी ठराव घेतला आहे. 

गावात कत्तलखाने होणार बंद आष्टी तालुक्यातील खडकत येथे सुरू असलेले सात बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते. त्याचप्रमाणे चार कत्तलखाने सील करण्यात आले होते. परंतु जुन्या ठिकाणी पुन्हा बेकायदेशीर कत्तलखाने उभे केले होते. काही जणांनी सील तोडून पुन्हा कत्तलखाने चालू केले होते. पंधरा  दिवसापूर्वी खडकत गावामध्ये गोवंश कापून त्याचे मांस हैदराबादला जात असताना पशुकल्याण मानद सचिव शिवशंकर स्वामी यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पाटोदा पोलिसांच्या मदतीने कडक कारवाई केली होती. 

टॅग्स :Beedबीड