शेतकरी विरोधी तीनही कृषी कायदे रद्द करा, गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान तत्काळ वाटप करा, सन २०२०च्या खरीप हंगामातील पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, बेनामी जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मुख्य चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सिरसाळा येथून पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉ. मुरलीधर नागरगोजे, शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत देशमुख, निर्मळ, माकपचे तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, शेतमजुर युनियनचे कॉ. सुदाम शिंदे, विशाल देशमुख, कॉ. बालाजी कडभाने, कॉ. पप्पू देशमुख, कॉ. मनोज देशमुख, निर्मळ पाटील, मनोज स्वामी यांचा सहभाग होता.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सिरसाळा येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST