शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पाण्यावरून एकाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:03 IST

माजलगाव : सामायिक बोअरचे पाणी घेण्यावरून शेजाºयांमध्ये वाद झाला. त्याचे भांडणात रूपांतर झाले. त्यानंतर चौघांनी एका चाळीस वर्षीय व्यक्तीला अक्षरश: रस्त्यावर दगडाने ठेचून जिवे मारले. ही खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.भागवत ...

ठळक मुद्दे सामायिक बोअरवरून झाला वाद

माजलगाव : सामायिक बोअरचे पाणी घेण्यावरून शेजाºयांमध्ये वाद झाला. त्याचे भांडणात रूपांतर झाले. त्यानंतर चौघांनी एका चाळीस वर्षीय व्यक्तीला अक्षरश: रस्त्यावर दगडाने ठेचून जिवे मारले. ही खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

भागवत बाबुराव गायके (४०, रा. नित्रूड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भागवत गायके व त्यांच्या शेताचे शेजारी बंडू डाके, शिवा डाके, दिनकर डाके, दत्ता डाके यांच्यामध्ये सामायिक बोअर आहे.

बोअरचे पाणी घेण्यावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. सोमवारी सकाळी याच पाण्यावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर डाके बंधूंनी गायकेवर हल्ला चढविला. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत गायकेंनी पळ काढला; परंतु या चौघांनी त्यांचा पाठलाग करीत मुख्य रस्त्यावरच त्यांचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला.

ही घटना परिसरातील लोकांनी पाहिल्यानंतर दिंद्रूड पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर ठाणे पोलीस निरीक्षक आसिफ सय्यद यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामाही करण्यात आला. त्यानंतर मयताची आई कौशल्या गायके यांच्या फिर्यादीवरून डाके बंधूंविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.तपासासाठी तीन पथके रवानापाण्याच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आमचा तपास सुरूच आहे. दिनकर डाकेला ताब्यात घेतले आहे. इतरांच्या तपासासाठी तीन पथके रवाना केली आहेत.- आसिफ सय्यदपोलीस निरीक्षक, दिंद्रूड ठाणे.