शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत भरावा लागतो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कर बीड : जन्मानंतर बाळाच्या पॅडपासून ते आयुष्याची वाटचाल आणि मृत्यूनंतरही ...

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत भरावा लागतो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कर बीड : जन्मानंतर बाळाच्या पॅडपासून ते आयुष्याची वाटचाल आणि मृत्यूनंतरही कफनसाठी सर्वसामान्यांना अत्यक्ष व अप्रत्यक्ष विविध कर भरावाच लागतो. अलिकडच्या दोन वर्षांत जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईने कळस गाठला आहे. अशावेळी ‘पोट भरण्याची मारामार, मी टॅक्स कशाला भरू? असता त्रागा सर्वसामान्यांकडून व्यक्त केला जातो. परंतू जनतेच्या पैशातूनच सरकारला कर मिळतो आणि तोच पैसा सार्वजनिक उपक्रमांच्या विकासावर खर्च केला जातो. कर भरणा नियमित केल्यास नागरिकांची आपोआप पत वाढते. स्वत:ची प्रगती करण्यासाठी करप्रणालीनुसार भरणा करणे सामान्यांच्या हिताचे आहे. टॅक्सच भरला नाही तर विकास कसा होणार, असा सूर अर्थ क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात.

अनेक जण कर चुकवतात तर अनेक जण कर भरणाही करतात. तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी, शासनाच्या नियमानुसार पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर आयकर भरावा लागतो. परंतू याआधी साधारण करदात्यांना २० हजारांपर्यंत कर भरणा करावा लागत होता. आता तो भरणा करावा लागत नाही. मुलांना शिक्षण मोफत मिळत असलेतरी गुरूजींचा पगार, शाळा इमारती उभारणी किंवा दुरुस्ती, शासकीय नोकरदारांचा पगार किंवा विविध क्षेत्रात विकासाच्या संकल्पना मांडत असताना नागरिकांचा कर भरणा महत्त्वाचे अंग आहे. देशाची प्रगती या विविध करातून संकलित होणाऱ्या रकमेतूनच होत असते. वस्त्रापासून भौतिक सुविधेच्या म्हणा किंवा खाद्यपदार्थ, औषधी आदी बाजारातील वस्तू खरेदी करताना जीएसटी अप्रत्यक्षरित्या वसूल केला जातो. जीवन जगताना स्थानिक यंत्रणेकडेही कर भरणा करावाच लागतो.

१) आपण टॅक्स भरता का? ( बॉक्स. खाली दिलेल्या प्रत्येकाकडून फक्त एका ओळीत आपण टॅक्स भरता का ही विचारणा करावी)

कामगार - कर भरत नाही, पण नगर पालिकेचा मालमत्तेचा कर, वीज बिल, खरेदीतून कर भरावाच लागतो.

ऑटो चालक - मला रिक्षाचा रोडटॅक्स, भरावा लागतो.

भाजीपाला विक्रेता - नगर पालिका जागेचा कर घेते.

फेरीवाला -- नगर पालिका कर घेते, खाद्यपदार्थ असतील करत अन्न परवाना घ्यावा लागतो.

सिक्युरिटी गार्ड -मी आयकर भरत नाही, पण मला मिळणाऱ्या वेतनातून कपात होते.

साफ सफाई कामगार- मी कर भरत नाही

सलून चालक - शॉप ॲक्ट, जागेचा कर भरतो.

लॉन्ड्री चालक -- शॉप ॲक्ट, वीज बिलाद्वारे कर भरतोच घर काम करणाऱ्या महिला - कर भरत नसलेतरी इतर खरेदी करताना जीएसटी अप्रत्यक्ष द्यावाच लागतो.

२) प्रत्येकजण टॅक्स भरतो

आयकर, जीएसटी, लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी), टोल टॅक्स, रोड टॅक्सच्या माध्यमातून प्रत्येक जण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कर भरणा करतोच. पाच लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न असेल तर प्रत्यक्ष कर भरावा लागतो. त्याआतील व्यक्तींना कर भरावा लागत नाही. सरकारला मिळणाऱ्या करातूनच व्यवसथा चालते. कर भरणा केल्यास आपली पत वाढते. बँकेकडून कर्ज मिळण्यातील अडचणी दूर होऊ शकते. स्वत:च्या व देशाच्या विकासासाठी उत्पन्नानुसार कर भरणे हिताचेच आहे. मात्र कर संकलन मधमाशीप्रमाणे असावे, जेणेकरून सामान्य घटकाला त्रास होणार नाही. - आदेश नहार, सी. ए. बीड

---------