केज येथे २४ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे त्यांचे सहकारी बाळासाहेब अहंकारे व दिलीप गीतेसोबत सायंकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान केज शहरात गस्त घालीत असताना केज-अंबाजोगाई रोडवरील सोनिजवळा फाट्याजवळ अनिल सीताराम सत्वधर हा बेकायदेशीररीत्या चोरट्या मार्गाने देशी व विदेशी दारू विक्री करीत होता. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, बाळासाहेब अहंकारे आणि दिलीप गीते यांनी छापा मारला असता त्यांना अनिल सत्वधर हा इसम टँगोपंच व मॅक्डॉल कंपनीच्या देशी व विदेशी दारू विक्री करीत असताना आढळून आला. पोलिसांनी छापा मारून त्याच्या ताब्यातील मॅक्डॉल आणि टॅंगोपंच या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या भरलेल्या बॉक्ससह अनिल सत्वधर यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध केज पोलीस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायदा ६५(ई)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरून दारू विक्री, एकास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST