शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षांनीच ठरविले ‘रेट’; क्लिप व्हायरल

By admin | Updated: January 15, 2017 22:59 IST

बीड : एमआयएममध्ये उभी फूट पडली असतानाच शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या समोरच प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यावर सौदेबाजीचा आरोप केला.

येथील पालिकेत उपनगराध्यक्षपदाच्या पाठिंब्यावरून एमआयएममध्ये उभी फूट पडली असतानाच शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या समोरच प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यावर सौदेबाजीचा आरोप केला. त्याची व्हिडिओ क्लिप रविवारी ‘व्हायरल’ झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.बीड पालिकेत एमआयएमचे नऊ नगरसेवक आहेत. त्यापैकी ७ जणांनी स्वतंत्र गट स्थापन करून काकू-नाना विकास आघाडीला उपनगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आ. इम्तियाज जलील यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन फुटीर नगरसेवकांना पक्षादेश डावलल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड दम भरला. तत्पूर्वी, शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी फुटीरवादी पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. व्हिडिओ क्लिपमध्ये डॉ. इद्रिस हाश्मी यांनी पक्षाला घरचा आहेर देताना प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यावर टोकाचे आरोप केले. प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही क्षीरसागरांकडून पाठिंब्यासाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करण्यास सांगितले. स्थानिक पातळीवर आघाडीला पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यानंतर मोईन यांनी माझा फोन घेतला नाही. आमच्यावर विकले गेल्याचा आरोप केला जातो; मात्र ज्यांनी हा सल्ला दिला, त्या प्रदेशाध्यक्षांना पक्ष का हटवीत नाही, असा सवालही इद्रिस यांनी उपस्थित केला. आम्हाला समाजाचे काम करायचे आहे. आम्ही प्रामाणिकपणे ते करीत आहेत. मात्र, आमच्यावर नाहक आरोप होत आहेत. त्यात तथ्य नाही, असा दावाही त्यांनी केला. डॉ. हाश्मी यांच्याशी संपर्क साधला असता तो आमचा अंतर्गत विषय आहे, त्यावर आताच बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलून कट केला. त्यानंतर वारंवार संपर्क साधूनही भ्रमणध्वनी उचलला नाही. (प्रतिनिधी)