शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:28 IST

बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे रविवारी संत-महंतांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि संत प्रतिमा पूजनाने उद्घाटन झाले.

ठळक मुद्देस्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सलग १४ व्या वर्षी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे रविवारी संत-महंतांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि संत प्रतिमा पूजनाने उद्घाटन झाले.

याप्रसंगी महादेव महाराज चाकरवाडीकर, श्रीक्षेत्र नारायणगडचे ह.भ.प.शिवाजी महाराज वे.शा.सं. धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराज, ज्योतिषाचार्य सूर्यकांत मुळे, शांतीलाल छाजेड, सुभाषचंद्र सारडा, उल्हास संचेती, उत्तमचंद मरलेचा, पारसमल बोरा, बालाप्रसाद जाजू, रतनलाल नहार, भगीरथ बियाणी, भगीरथ चरखा, माणिकचंद नहार, प्रेमचंद कोटेचा, संपतलाल मुनोत, नगरसेवक शुभम धुत, गंगाबिशन करवा, अशोकलाल मुनोत, आसाराम खटोड, अ‍ॅड.विजयकुमार देशपांडे, राजेंद्र बन्सोडे, अ‍ॅड.सदानंद वैद्य, अभय कोटेचा, अशोक मुनोत, प्रा. डी.एस. कुलकर्णी, प्रकाश नहार, संपतलाल कोटेचा, प्रकाश राका, निखील ब्रह्मेचा, उज्ज्वल कोटेचा, राजू बंब, सतीश कोटेचा, प्रेमसागर गादिया, उज्ज्वला मुनोत, निर्मला खटोड, चंपालाल डुंगरवाल, सिध्दार्थ मुनोत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी सर्व मान्यवरांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, शुभम खटोड, आशिष खटोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर म्हणाले,सुसंस्कारित समाजासाठी कीर्तन महोत्सवाची गरज आहे. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. संयोजक भरतबुवा रामदासी यांनी सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. महोत्सवास मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी केले.