शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार सर्वस्तरावर अपयशी- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:37 IST

बीड : शासन शेतक-यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कर्जमाफी असो अथवा जीएसटी, सर्वस्तरावर अंमलबजावणीत युती सरकार अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा मुख्यमंत्री करीत असून, कृती मात्र शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्र परिषदेत केला. काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने ते बीड येथे आले होते.

ठळक मुद्देपोकळ घोषणा, कृती मात्र शून्य; शेतक-यांना मिळेना नुकसान भरपाई

बीड : शासन शेतक-यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कर्जमाफी असो अथवा जीएसटी, सर्वस्तरावर अंमलबजावणीत युती सरकार अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा मुख्यमंत्री करीत असून, कृती मात्र शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्र परिषदेत केला. काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने ते बीड येथे आले होते.

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, खा. रजनी पाटील, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी युती सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. बोंडअळीने शेतकरी पूर्णत: अडचणीत आला, त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही.

कर्जमाफी केल्याचा आव शासन करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र कुणालाही कर्जमाफी झाली नाही. पीक विम्याचे पैसे मिळेनात, हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. तर इकडे मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग परेशान आहे. या दोघांचे प्रश्न सोडविण्याऐवजी शासनाने मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी जाळी बसविली. अशा जाळ्या कुठे-कुठे बसविणार? असा प्रश्न उपस्थित करुन ते म्हणाले, प्रश्न जर वेळेत सुटले तर आत्महत्या आटोक्यात येतील. पूर्ण महाराष्टÑात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले, पावणे दोन लाख पदे रिक्त असतानाही ती भरली जात नाहीत. त्यामुळे बेरोजगारात असंतोष आहे. पदे रद्द न करता जागा भराव्यात, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची तयारी झाली आहे. आघाडी करायची की नाही? याचा निर्णय बाकी असून, चर्चा चालू आहे, नेहमीपेक्षा वेगळा फार्म्यूला काय करता येईल? यासाठी मंथन चालू आहे. आघाडीच्या संदर्भात २२ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, त्यात यावर चर्चा होईल, असे ते म्हणाले.

लातूर, उस्मानाबाद आणि बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यावेळी बीडला संधी मिळणार काय? असे विचारले असता ते म्हणाले, या संदर्भातही चर्चा होणार आहे. बीड जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. याच पत्र परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शासनावर टीका केली. शेतकºयांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

‘निकषांशिवाय तातडीने मदत द्या’गेवराई तालुक्यातील गारपीटग्रस्त भागातील शेतकºयांशी संवाद करण्यासाठी शुक्रवारी दुपारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तालुक्यातील खळेगाव येथे आले. यावेळी त्यांच्या सोबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. रजनी पाटील, युवकचे प्रदेश अध्यक्ष विश्वजीत कदम, सिराज देशमुख, माजी आ.सुरेश नवले, आदित्य पाटील, अशोक हिंगे, तालुका अध्यक्ष सुरेश हात्ते, सय्यद सिराज आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, नुकसानग्रस्त भागातील शेतक-यांना निकषांशिवाय तातडीने ५० हजार रुपये मदत द्यावी. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बीड जिल्ह्यात होते मात्र त्यांनी शेतक-यांसाठी कोणतीही मदत जाहीर केली नाही. त्यांनी गारपीटग्रस्त भागाकडे पाठ फिरविली, असे त्यांनी सांगितले.