शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्या सुरू करा, अन्यथा मंजुरी होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:41 IST

दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी चारा छावण्यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी छाननी करुन आवश्यक तेथे मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआस्तिक कुमार पाण्डेय : ७ दिवसांत छावणी सुरू करा, डिजिटल पद्धतीने होणार जनावरांची मोजदाद

बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी चारा छावण्यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी छाननी करुन आवश्यक तेथे मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू न झाल्यामुळे त्या परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मंजूर असूनही चारा छावण्या सुरू न केलेल्यांना ७ दिवसांचा वेळ दिला आहे. छावण्या सुरू न झाल्यास त्या छावण्यांची मंजुरी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ८०० छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. पैकी फक्त २६५ चारा छावण्या कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी आवश्यकता असताना देखील अनेक चालकांनी चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे इतर गावातील छावण्यांवर जनावरं नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. मंजूर असलेली छावणी तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी देखील चारा छावण्या सुरू करण्यासाठी ७ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतर जर छावणी सुरू नसेल तर छावणीची मंजुरी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मागील अनुभव लक्षात घेता यावेळी डिजिटल पद्धतीने जनावरांची मोजदाद केली जाणार आहे. त्यानुसारच छावणीची देयके अदा केली जणार आहेत. डिजिटल पद्धतीने मोजणी झाल्यामुळे गैरप्रकार टाळण्यास मदत होणार आहे.दुभत्या जनावरांवर परिणामजिल्ह््यातील बहुतांश शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीला जोडून दुग्ध व्यवसायासाठी पशुपालन करतात. काही भागात दुधापासून बनवलेला खवा हा देशातील अनेक शहरात जातो. चारापाण्याची कमतरता व छावण्यांमध्ये मिळत असलेले पशुखाद्य संतुलित दुभत्या जनावरांवर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी दिल्या.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र