शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नोटीस बजावताच अनेकांनी अंथरुण धरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

माजलगाव : जिल्ह्यात २०१०-२० या कालावधीत नरेगा योजनेत नियमबाह्य कामे करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजलगाव तालुक्यातील ५५ ग्रामसेवक व ४९ ...

माजलगाव : जिल्ह्यात २०१०-२० या कालावधीत नरेगा योजनेत नियमबाह्य कामे करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजलगाव तालुक्यातील ५५ ग्रामसेवक व ४९ सरपंचांना गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्यानंतर अनेकांनी धास्ती घेऊन अंथरुण धरले आहे. ग्रामीण भागातील विकास कामे राबविण्यासाठी शासनाकडून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना २०१० पासून सुरू आहे. मात्र, या योजनेचा गैरफायदा घेऊन ती राबविल्याने त्याच्या लेखापरीक्षण अहवालात गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या; परंतु त्याकडे जिल्हाधिकारी जगताप यांनी दुर्लक्ष केले. याबाबत न्यायालयाने गंभीर दखल घेतली. दिरंगाईप्रकरणी जिल्हाधिकारी जगताप यांची त्वरित बदली करून प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरून बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत नरेगा कामातील संबंधित गावांतील तत्कालीन ग्रामसेवक, सरपंचांना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावली आहे. माजलगाव तालुक्यातील ५५ ग्रामसेवक व ४९ सरपंचांना लेखापरीक्षण अहवालातील गंभीर त्रुटी व इतर आक्षेपार्ह मुद्यांबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास कार्यवाही करण्याचा इशारा या नोटिसीमध्ये दिला आहे.

काही निवृत्त, काही मृत

दरम्यान, मागील दहा वर्षांच्या काळात अनेक ग्रामसेवक निवृत्त झाले; तर काही मृत झाले आहेत. ज्यांना नोटीस बजावली आहे त्यापैकी अनेकांनी आपल्यावर कार्यवाही होणार अशी धास्ती घेतल्याने त्यांना दुखणे आले आहे.