शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मेकॅनिकचा मुलगा बनला जिल्हाधिकारी; अंबाजोगाईच्या किशोरकुमार देवरवाडेचे युपीएससीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 17:41 IST

UPSC Result : प्रशासकीय अधिकारी व्हायचे असल्याने त्यांनी रूग्णसेवेबरोबरच अभ्यासही सुरूच ठेवला.

ठळक मुद्देकोरोना महामारीत रूग्णसेवाआजही ते लसीकरण विभागात कार्यरत

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई : वडिलांच्या मेहनतीला मुलाने जिद्दीची जोड देत जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. राज्य परिवहन महामंडळात मेकॅनिक असलेल्या कर्मचाऱ्याचा मुलगा आता जिल्हाधिकारी होणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील डॉ. किशोरकुमार अशोकराव देवरवाडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ७३५ वा क्रमांक पटकावून जिल्ह्याची मान उंचावली आहे.

अशोकराव देवरवाडे हे माजलगाव आगारात यांत्रिकी विभागात काम करत होते. तेव्हा किशोरकुमार यांनी माजलगावमधीलच सिद्धेश्वर विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई तर उच्च माध्यमिक शिक्षण लातूरमध्ये घेतले. चांगले गुण घेऊन ते वैद्यकीय क्षेत्रात उतरले. सोलापूरला एमबीबीएस करून स्वाराती महाविद्यालयात रूग्णसेवा केली. परंतु, त्यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचे असल्याने त्यांनी रूग्णसेवेबरोबरच अभ्यासही सुरूच ठेवला. २०१८-१९ साली त्यांची मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्तीही झाली होती. परंतु, तरीही त्यांनी ही नोकरी केली नाही. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. पुन्हा ते अभ्यासासाठी दिल्लीला गेले. येथेही रूग्णालयात रूग्णसेवा करण्याबरोबरच त्यांनी अभ्यास केला. याच मेहनतीचे त्यांना फळ मिळाले असून, देशात ७३५ वा क्रमांक पटकावून त्यांनी वडिलांची आणि जिल्ह्याची मान उंचावली आहे. त्यांच्या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

परिस्थितीमुळे सायकलवरच प्रवासडॉ. किशोरकुमार यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे त्यांनी सुरूवातीपासून संघर्ष केलेला आहे. डॉक्टर असतानाही ते परिस्थितीमुळे सायकलवरुनच फिरले. दिल्लीतही रूग्णालयात नोकरी करण्यासाठी त्यांनी रिक्षातून, रेल्वेतून प्रवास केला. याच संघर्षामुळे आज त्यांना हे यश मिळाले आहे.

कोरोना महामारीत रूग्णसेवामागील दीड वर्षापासून देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. याच महामारीत डॉ. किशोरकुमार यांनी दिल्लीतील रूग्णालयात कोरोना वॉर्डात राहून कर्तव्य बजावत रूग्णसेवा केली. आजही ते लसीकरण विभागात काम करत आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगBeedबीडdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या