शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

बीड : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. खत कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्यावी. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना ...

बीड : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. खत कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्यावी. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे. रखडलेले विविध अनुदान व विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

लॉकडाऊनमुळे स्थलांतर थांबले

बीड : तालुक्यातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे व विविध महानगरात रोजगारासाठी असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय बंद आहेत. गावातही हाताला काम नाही. सर्व बंद असल्याने महानगराकडेही जाता येईना. यामुळे अनेकांचे स्थलांतर थांबले आहे.

घंटागाडी येईना, नागरिकांची गैरसोय

अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहात आहे. गाडी नियमित व वेळेवर आल्यास योग्यरीत्या कचऱ्याची विल्हेवाट लागेल व स्वछता राहील. यासाठी घंटागाडी नियमित वेळेवर आली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पांडे यांनी केली आहे.

‘ओव्हरलोड’ वाहतूक; लहान रस्त्यांची दैना

अंबेजोगाई : शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड डम्परमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे, तसेच या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.