केज : दुचाकीसमोर हरीण आल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील दहीफळ येथे आज, सोमवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
केज तालुक्यातील दहिफळ (वड.) येथील आसाराम विष्णू ठोंबरे (वय २६) हे आसाम येथे भारतीय सैन्यात कर्तव्यावर होते. आठ दिवसांपूर्वी ते गावाकडे सुटीवर आले होते. २३ जून रोजी दुपारी केजहून गावाकडे दुचाकीने जाताना केज-बीड रोडवरील कदमवाडी-उमरी फाट्यादरम्यान एक हरीण आडवे आल्याने अपघात झाला. या घटनेत ठोंबरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना बीड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती व त्यांची प्रकृती सुधारत होती. दरम्यान, त्यांना पुढील उपचारासाठी शनिवारी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. दरम्यान, रविवारी (दि. २७) पहाटे त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.
आसाराम ठोंबरे हे तीन वर्षांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व सात महिन्यांचा मुलगा आहे.
===Photopath===
270621\img-20210627-wa0025.jpg
===Caption===
आसाराम (अशोक) विष्णू ठोंबरे