शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्ध्व कुंडलिकाने फुलवले बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

वडवणी : उर्ध्व कुंडलिका धरण भरले आणि वडवणी, धारूर तालुक्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले. पिण्याच्या पाण्याची सोय तर झालीच ...

वडवणी : उर्ध्व कुंडलिका धरण भरले आणि वडवणी, धारूर तालुक्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले. पिण्याच्या पाण्याची सोय तर झालीच शिवाय शेतीसाठी पाणीही मिळणार असल्यामुळे ते सुखावले. यावर्षी पहिल्याच्या टप्यात हा प्रकल्प तुडुंब भरून ओसंडून जातोय. तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. वडवणी तालुका हा कायम दुष्काळाच्या खाईत असायचा मात्र अप्पर ऊर्ध्व कुंडलिका धरणामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले आहे.

या प्रकल्पातील प्रकल्पीय पूर्णसाठा क्षमता १८.७७ द.श.घ.मी.असून, जलाशयाची पूर्ण पाणी पातळी ५३७ मीटर आहे. या प्रकल्पातील जिवंत पाणी साठा १५.५७ द.श.घ.मी. असून, ३० जुलै रोजी या धरणात ५३६.३५ पाणीसाठा आहे. तालुक्यातील जवळपास २ हजार ८०० हेक्टर शेती या धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव पूर्णक्षमतेने भरत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. हवामान खात्याच्या इशारानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, या धरणात पाण्याची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे येणारे पाणी हे कुंडलिका नदीपात्रात सोडावे लागत आहे. याबाबत बीड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अजय गुजर म्हणाले की, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, धरणात येणाऱ्या येव्यामुळे (Inflow) धरण निर्धारित पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर येणारा येवा कुंडलिका नदीपात्रात सोडावा लागणार आहे. धरणात येणाऱ्या येवा पाहता आजची ५३६.३५ मीटर या पातळीनंतर येणाऱ्या येव्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. याबाबत तहसीलदार प्रकाश सिरसेवाड म्हणाले की तलावाची पाहणी केली असून, जवळपास ९० टक्के भरलेले आहे. ९० टक्के धरणाची पातळी ५३६.४५ असून, कधीही पाऊस पडला की धरणातून पाणी सोडले जाईल. नदी काठावरील गावांना, नागरिकांना याबाबत कळविले आहे.

असलेले वरदान ठरलेले ऊर्ध्व कुंडलिका धरण गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या सतत पावसामुळे या धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन धरणात ३० जुलै रोजी ८९.९५ टक्के पाणीसाठा असून, पूर्णक्षमतेने भरत असल्यामुळे येणाऱ्या पाण्याचा निसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना आणि नदीशेजारी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

310721\rameswar lange_img-20210720-wa0026_14.jpg~310721\rameswar lange_img-20210720-wa0025_14.jpg