शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षेत सहा परीक्षार्थी रस्टिकेट; शिक्षकावरही कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:40 IST

राज्य माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारी सुरु झालेल्या दहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपी बाळगणाºया सहा विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी परळी तालुक्यातील लाडझरी येथील परीक्षा केंद्रावर केलेल्या पाहणीत एका शिक्षकाजवळ भ्रमणध्वनी आढळून आल्याबद्दल त्याला परीक्षेच्या कामावरुन कमी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारी सुरु झालेल्या दहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपी बाळगणाºया सहा विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी परळी तालुक्यातील लाडझरी येथील परीक्षा केंद्रावर केलेल्या पाहणीत एका शिक्षकाजवळ भ्रमणध्वनी आढळून आल्याबद्दल त्याला परीक्षेच्या कामावरुन कमी केले.

जिल्ह्यात ४५ हजार ९३२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. गुरुवारी प्रथम भाषा विषयाची परीक्षा होती. वडवणी तालुक्यातील मंकाबाई विद्यालय परीक्षा केंद्रात उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्या पथकाने ३ विद्यार्थ्यांवर कॉपी बाळगल्याप्रकरणी कारवाई केली. तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनोद देवगावकर यांच्या पथकाने केज येथील सरस्वती कन्या विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यावर कारवाई केली.माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांच्या पथकाने बीड तालुक्यातील जवळ हायस्कूल जवळा येथील परीक्षा केंद्राची तपासणी केली. या वेळी कॉपी बाळगणाºया दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

शिक्षकाजवळ मोबाईलपरळी तालुक्यातील लाडझरी येथील परीक्षा केंद्राची मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी केली. या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत एका शिक्षकाकडे भ्रमणध्वनी आढळून आला. या प्रकरणी संबंधित शिक्षकाला परीक्षेच्या कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाईल सीईओंकडेहोणार जमापरीक्षा कालावधीत भरारी वा इतर नियंत्रण पथकाच्या पाहणीत परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकाकडे भ्रमणध्वनी आढळल्यास तो सीईओंकडे जमा केला जाणार असून परीक्षेनंतर तो सीईओंकडून परत घ्यावा लागणार आहे.

केंद्र प्रमुखांचे दुर्लक्ष, पर्यवेक्षक मजेतदहावी, बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी नियंत्रणात आणण्यासाठी भरारी पथक कार्यरत आहेत. मात्र केंद्र प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक केंद्रांवर पर्यवेक्षकांची चांदी होत आहे. भ्रमणध्वनी तसेच प्रतिबंधित वस्तू सहजरीत्या बाळगल्या जात आहेत.