शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मांजराचे सहा दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 22:05 IST

लातुर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांतील सिंचनासाठी वरदान ठरलेले आणि ४० गावांना पिण्याचे पाणी पुरविणारे केज तालुक्यातील मांजरा धरण शुक्र वारी पहाटे सहा वाजता ९९.४७ टक्के भरले. त्यामुळे तात्काळ धरणाचे सहा दरवाजे २५ सेंटी मीटरने उघडण्यात आले.

केज (जि. बीड) : लातुर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांतील  सिंचनासाठी वरदान ठरलेले आणि ४० गावांना पिण्याचे पाणी पुरविणारे केज तालुक्यातील  मांजरा धरण शुक्र वारी पहाटे सहा वाजता ९९.४७ टक्के भरले. त्यामुळे तात्काळ धरणाचे सहा दरवाजे २५ सेंटी मीटरने उघडण्यात आले. परिणामी मांजरा धरणा खालील नदी पात्रात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

या धरणाची पाणी पातळीची क्षमता ६४२.३७ मीटर एवढी आहे.  सध्या या धरणातील एकूण  पाणी साठा २२३.१५७  दलघमी एवढा असून धरणात येणा-या पाण्याचा ओघ ११.९७३  दलघमी प्रतिसेकंद असा आहे.  सहा दरवाजे उघडल्यामुळे धरणातून १४८.२० घनमिटर/प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग मांजराच्या नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे धरणाखालील नदीच्या काठावरील गावांत पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी २६ सप्टेंबर रोजी या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते. १९८५ पासून  आतापर्यंत १४ वेळा या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत

८२ गावांना सावधानतेचा इशारामांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडल्यामुळे  कर्नाटक राज्याच्या सिमेपर्यंतच्या नदीकाठच्या सौंदना, आवाड शिरपूरा, नायगाव, इस्थळ, वाकडी, आपेगाव, पाटोदा(ममदापुर), धानोरा, तांदुळजा आदी  ८२  गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहुराज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली

पोलीस बंदोबस्त वाढविलामांजरा धरण हे बीड आणि  उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिमेवर असल्यामुळे   मांजरा धरण भरल्याच्या पाशर््वभूमीवर बीड  व उस्मानाबाद पोलीस मुख्यालयाकडून  त्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त  सुरू असल्याची माहिती सपोनि राहुल देशपांडे यांनी दिली .