शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाचे दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीस पोलिसांनी बेदम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीस पोलिसांनी बेदम मारहाण करून अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. या घटनेचा निषेध नोंदवत अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना सेवेतून निलंबित करा, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन गुरुवारी सायंकाळी सुरूच होते.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अंबाजोगाई शहरातील डॉ. सुहास यादव यांना जाणीवपूर्वक गुंतविण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. डॉ. सुहास यादव यांचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये व त्यांचे सहकारी यादव कुटुंबीयांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. मंगळवारी रात्री या प्रकरणाचा तपास करताना डॉ. यादव यांचे चुलत भाऊ विलास यादव यांना पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली. अर्वाच्च भाषा वापरली. यामुळे बुधवारपासून मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अ‍ॅड. माधव जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी सुरू झालेले आंदोलन गुरूवारी सायंकाळपर्यंत सुरूच होते. आंदोलनात नंदकिशोर मुंदडा, अशोक देशमुख, अशोक गुंजाळ, राजेसाहेब देशमुख, बबन लोमटे, हनमंत मोरे, सारंग पुजारी, डॉ. नंदकिशोर सोमवंशी, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. अजित लोमटे, आबासाहेब पांडे, महेश लोमटे, प्रा. प्रशांत जगताप, संजय भोसले, वैजीनाथ देशमुख, प्रवीण ठोंबरे, अ‍ॅड. संतोष लोमटे, राहुल मोरे, प्रशांत आदनाक, गोविंद पोतंगले, ज्ञानोबा कदम, अ‍ॅड. रणजित सोळंके, बालाजी शेरेकर, रवीकिरण देशमुख, भीमसेन लोमटे, विजयकुमार गंगणे, विजय भोसले, अंगद गायकवाड, धर्मराज सोळंके, स्वप्निल सोनवणे, लहू शिंदे, बाळासाहेब शिंदे, राणा चव्हाण, प्रकाश बोरगावकर, अ‍ॅड. प्रशांत शिंदे, अभिजीत लोमटे, अ‍ॅड. भागवत गाठाळ, ईश्वर शिंदे, रणजित डांगे, श्रीकांत कदम, अतुल जाधव, महेश जगताप, राजकुमार गंगणे, संजय कदम व मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

...

आंदोलनाची व्याप्ती वाढली.

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनाची व्याप्ती आता वाढली आहे. आंदोलनात विविध संघटना सहभागी होत आहेत. बीड जिल्ह्यात सर्वत्र आंदोलनाचे लोण पसरले असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अ‍ॅड. माधव जाधव यांनी दिली.

080721\img-20210708-wa0121.jpg

अंबाजोगाई येथे सुरू असलेले आंदोलन