शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सिंदफना, उथळा प्रकल्पातील पाण्याने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र अजूनपर्यंत सिंदफना व उथळा मध्यम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र अजूनपर्यंत सिंदफना व उथळा मध्यम प्रकल्पात पाण्याचा नव्याने थेंबही जमा झाला नाही. तालुक्यातील नद्या-नालेही कोरडेठाक आहेत. मोठा पाऊस नसल्याने पाणी प्रश्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिरूर तालुक्यातील सिंदफना प्रकल्प सर्वांत जुना आहे. त्यानंतर उथळा मध्यम प्रकल्प तयार झाला. या दोन्ही प्रकल्पांशिवाय बेलपारा मध्यम प्रकल्पदेखील तालुक्याला आधारभूत ठरत असतो. गतवर्षी सर्व प्रकल्प ओसंडून वाहत होते. परिणामी, नद्या-नाल्यांनादेखील पाणी दिसत होते. या वर्षीही पाऊस वेळेवर आला खरा, परंतु कुठेच पाणी वाहिले नाही. सध्या शेतशिवार पिकाने हिरवेगार दिसत आहेत. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने आता पिकालाही पावसाची गरज भासू लागल्याची स्थिती आहे.

तालुक्यात सिंदफना, उथळा, बेलपारा, घाटशिळा, मोरजळवाडी, उकांडा, वार्णी आदी ठिकाणी लहान-मोठे दहा-बारा जलाशय आहेत. परंतु एकाही जलाशयात पाणी जमा झाले नाही. पाऊस आहे, पण पाणी नाही.. अशी अवस्था असल्याने भविष्यातील पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त होत आहे. पावसाच्या नोंदीवरून एकूण टक्केवारीत जवळपास अर्धाच पल्ला गाठला आहे.

....

९ टक्केच पाणीसाठा

सध्या सिंदफना मध्यम प्रकल्पात ९ टक्के पाणीसाठा आहे. नव्याने पाणीपातळीत वाढ झालीच नाही. तीच अवस्था उथळा प्रकल्पाची आहे. याच प्रकल्पावरून शहराला पाणीपुरवठा होत असल्याने हे दोन्ही प्रकल्प भरणे शिरूरकरांसाठी गरजेचे आहे. शहराच्या जवळच असलेला सिद्धेश्वर बंधारादेखील अद्याप कोरडाच आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. अन्यथा पुन्हा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, असे चित्र सध्या आहे.

310721\img-20210527-wa0051.jpg

फोटो