शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्राने सर्जा-राजा नामशेष होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST

पोळा विशेष लोकमत न्यूज नेटवर्क कडा : पारंपरिक काळात शेती करताना बैलांचा मोठा वापर होत असे. गावागावातील शेतकरी त्यांच्या ...

पोळा विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : पारंपरिक काळात शेती करताना बैलांचा मोठा वापर होत असे. गावागावातील शेतकरी त्यांच्या दारात बैलांची जोडी असायची; पण काही वर्षांपासून बैल सांभाळण्यापेक्षा दुभत्या गायी पालनाचा कल वाढत गेला. शेतीच्या मशागतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने शेतकऱ्यांच्या दावणीपुढील बैलांची संख्या घटली. बैलांऐवजी घरासमोर ट्रॅक्टर दिसू लागले. यामुळे लाखांच्या घरात असलेल्या बैलांची संख्या आता फक्त १७ हजार ५८९ एवढी आहे. यामुळे शेतकऱ्यांची सर्जा-राजाची बैलजोड आता दावणीतून नामशेष होऊ लागल्याचे पशुधन विकास कार्यालयाच्या आकडेवारीवरून दिसत आहेत.

पूर्वी पोळा सणाच्या दिवशी शेतकरी बैलांची थाटामाटात पूजन करून मिरवणूक काढायचा. तेव्हा गावच्या मंदिरासमोर जागा अपुरी पडायची. बैलांशिवाय शेती नसायची; पण आता आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने आणि बैलजोड्या संभाळताना पोषण्याचा खर्च विनाकारण वाटू लागल्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागली. तर बैलजोडीऐवजी दुभत्या गायी घेऊन त्या सांभाळण्याकडे कल वाढला. त्या पैशातून शेतीची ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागल्याने बैलजोडी भविष्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पोळ्याला बोटावर मोजता येतील एवढ्याच बैलजोड्या आहेत.

....

कृषी विभागाकडून ट्रॅक्टर

आधुनिक काळात शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला महत्त्व येऊ लागले. मोठ्या प्रमाणावर शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू लागले. त्याचबरोबर कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर मिळू लागल्याने बैलाजोडीसाठी शेतकरी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. तालुका पशुधन विकास कार्यालयात २०१९च्या पशुगणनेनुसार शेतीकामाठी फक्त १७ हजार ५८९ बैलाची नोंद आहे. गावरान, विदेशी, रेडकू अशा लहान मोठ्याची एकूण २५ हजार ५५९ ची नोंद असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

...

बैलांना मोठ्या प्रमाणावर चारा लागतो. शेतीचा फायदा होतो. थोडी शेती असल्याने बैलजोड संभाळणे शक्य नसल्याने ट्रॅक्टरची शेती परवडत आहे. -गहिनीनाथ आंधळे,शेतकरी,लिंबोडी, ता. आष्टी.

...

दहा वर्षांपूर्वी आमच्या गावात घरोघरी बैलजोडी असायची. त्यानेच शेती व्हायची. पोळ्याला बैलजोडी दारात असल्याचा आनंद आणि अभिमान वाटायचा. आता आमच्या गावात दहा ते पंधरा बैल आहेत.

-सोपान आंधळे, लिंबोडी, ता. आष्टी.