२९ बीइडीपी १३ दर्शनासाठी मंदिराबाहेर प्रतीक्षा करणारे भाविक
२९ बीसडीपी १४ आत्मतिर्थस्थळी असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. (सर्व छाया : सखाराम शिंदे)
गेवराई : श्री दत्तात्रय प्रभूंचे नित्य भोजन स्थान असलेले तालुक्यातील पांचाळेश्वर येथे मंगळवारी श्री.दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे चार ते पाच वाजेदरम्यान अभिषेक करण्यात आला. तसेच पाच ते सहा वाजता श्री.दत्तात्रय जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. सकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान दत्तात्रय बाळक्रीडा ग्रंथ व दत्तात्रय स्तोत्राचे पारायण शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत करण्यात आले. सकाळी ११ ते ११.३० आत्मतिर्थ स्नान करून दुपारी १२ ते १२.३० नदी पात्रात महाआरती करण्यात आली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठी यात्रा न भरता मोजक्याच भाविकांच्या उपस्थित दत्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी येथे श्री दत्तात्रय प्रभू आत्मतिर्थ प्रतिष्ठान व मंदिर संस्थानच्या प्रसादालयाचे उद्घाटन माजी जि.प अध्यक्ष विजयसिंह पंडित,नितिन कोटेचा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णराज बाबा गुर्जर,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर,जि.प सदस्य फुलचंद बोरकर,भरत खरात, रविद्र कोठी,सखाराम शिंदे,सुशिल टकले,अमोल कापसे,शेळके सह अनेक जण उपस्थित होते.