शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, लस घेतलेल्या लाभार्थ्यांना बसविले जमिनीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST

(नंतर) फाेटो क्रमांक 29bedp-21 - ‘लोकमत’ने निदर्शनास आणताच दुपारनंतर सोशल डिस्टन्ससह बसायला मिळालेल्या खुर्च्या सोमनाथ खताळ रिॲलिटी चेक बीड ...

(नंतर) फाेटो क्रमांक 29bedp-21 - ‘लोकमत’ने निदर्शनास आणताच दुपारनंतर सोशल डिस्टन्ससह बसायला मिळालेल्या खुर्च्या

सोमनाथ खताळ

रिॲलिटी चेक

बीड : कोरोना लसीकरण सुरू करण्यापूर्वी ड्राय रन घेतला. यात केवळ नियोजनाचा देखावा दिसला. प्रत्यक्षात ढिसाळ कारभार असल्याचे शुक्रवारी बीड जिल्हा रूग्णालयात दिसले. लस घेतलेल्या आशा, अंगणवाडीताईंना निरीक्षण कक्षात चक्क जमिनीवर बसविण्यात आले. तसेच येथे कोरोनाच्या कसल्याच नियमांचे पालन केले नसल्याचेही दिसले.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी ८ जानेवारीला प्रत्येक केंद्रावर ड्राय रन घेण्यात आला होता. यात सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, थर्मल गण अशा विविध नियमांचे पालन करण्यात आले होते. असेच नियोजन प्रत्यक्ष लसीकरणात होणार होते. परंतु शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन आढावा घेतला असता लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांना बसायला खुर्च्यादेखील नव्हत्या. त्यांना जमिनीवर बसविण्यात आले होते. या प्रकाराने संताप व्यक्त करण्यात आला. आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहे.

दुपारनंतर बसायला मिळाल्या खुर्च्या

लोकमतने रिॲलिटी चेक केल्यानंतर प्रतिक्रियेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना संपर्क केला. त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना भेट देण्यास सांगितले. दुपारनंतर परिस्थिती बदललेली दिसली. खाली बसणाऱ्यांना खुर्च्या तर निरीक्षण कक्षांची संख्याही वाढविण्यात आली.

डॉक्टरांना खुर्च्या, आशांना दुजाभाव का?

कोरोनाकाळात डॉक्टर, परिचारिकांनी जेवढा जीव धोक्यात घालून काम केले, तसेच आशाताई, अंगणवाडी सेविका यांनीही सर्वेक्षण, नोंदणी असे विविध कामे केलेले आहेत. त्या सुद्धा काेरोना योद्धा आहेत. परंतु लसीकरण केंद्रात दुजाभाव केल्याचे दिसले. डॉक्टरांना बसायला खुर्च्या दिल्या जातात, परंतु अशांना जमिनीवर बसविण्यात आले. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.