शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पती-पत्नीचा वाद, पोलीस अधीक्षक कार्यालयातच पतीने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 15:45 IST

poison taken by husband in Beed Superintendent of Police's office : दोघांचेही समुपदेशन सुरू असताना इम्तीयाजला पाच मिनिटांसाठी बाहेर बसण्यास सांगितले. याचवेळी त्याने बाहेर येत सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन केले.

ठळक मुद्देबीडमधील घटनेत पतीची प्रकृती चिंताजनकसध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

बीड : पती-पत्नी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोघांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात ४ जानेवारी रोजी बोलावले होते. समुपदेशन सुरू होते. याचवेळी पतीने कक्षाच्या बाहेर येत विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इम्तीयाज कुरेशी (३०, रा.गेवराई) असे विष घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इम्तीयाज यांचा १० वर्षांपूर्वी गेवराई शहरातीलच मुलीशी विवाह झाला. सुरुवातीचे काही दिवस आनंदाने गेले. त्यांना दोन अपत्येही आहेत. परंतु, मागील वर्षभरापासून त्यांच्यात खटके उडू लागले. त्याची पत्नी माहेरी गेली. त्यानंतर तिने महिला तक्रार निवारण केंद्रात अर्ज दिला. दोन वेळा समुपदेशन करून सोमवारी तिसरी तारीख होती. दोघांचेही समुपदेशन सुरू असताना इम्तीयाजला पाच मिनिटांसाठी बाहेर बसण्यास सांगितले. याचवेळी त्याने बाहेर येत सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन केले. येथील महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर त्याला तात्काळ जुन्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात पाठविले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

कक्षात नेमके झाले काय?इम्तीयाजसोबत संसार करण्यास तयार आहे, परंतु तो नकार देत आहे. सोमवारी तिसरी तारीख असल्याने आम्ही आलो होतो. अचानक बोलणे चालू असतानाच त्यांनी विषारी द्रव प्राशन केल्याचे इम्तीयाजची पत्नी माध्यमांना सांगत होती. जिल्हा रुग्णालयात ती आपल्या चिमुकल्यासह पतीला आधार देण्यासाठी आली होती.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांची धावपळसध्या जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. अचानक हा रुग्ण ओपीडी क्लिनीकमध्ये आल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. परंतु, त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. डॉ.स्वप्निल बडजाते, डॉ.कमलाक्षी काकडे, परिचारिका शमा गुजर, विक्रांत पाखरे, कॉलमन गणेश पवार, गोरक्षनाथ घोलप, रोहित घनघाव, बाळकृष्ण पवार यांनी त्याला उपचार करून स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्याची ॲॅन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Suicideआत्महत्याBeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीड