शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! दुधाच्या पाऊचमध्ये कोंबडीचा पीस; डेअरीचे म्हणणे, 'दुध स्वच्छ, पाऊच खराब'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 13:00 IST

दुधाला वाढती मागणी असल्याने अनेक दूध डेअरीकडून त्याची पाऊचमध्ये विक्री केली जात आहे.

ठळक मुद्देडेअरीकडून दूध आणि पाऊचच्या स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष पॉलिथीनच्या पाऊच रोलला कोंबडीचा पीस चिटकून आला असावा.

केज : रुपमाता डेअरीच्या दुधाच्या पाऊचमध्ये कोंबडीचा पीस आढल्याची खळबळजनक घटना केज शहरात रविवारी उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे डेअरीकडून दूध आणि पाऊचच्या स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे पुढे आले आहे.  दरम्यान, अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे ग्राहकाने सांगितले आहे. तर दुध स्वच्छ असून पाऊच अस्वच्छ आले असल्याचे स्पष्टीकरण डेअरीतर्फे देण्यात आले आहे.

दुधाला वाढती मागणी असल्याने अनेक दूध डेअरीकडून त्याची पाऊचमध्ये विक्री केली जात आहे. मात्र, पाऊचमधील दुधाची स्वच्छता जपली जात नसल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. सादेक शेख यांनी केज शहरातील एका दूध विक्री करणाऱ्या सेंटरमधून रुपमाता डेअरीचा दुधाचा छोटा पाऊच रविवारी ( दि. 20) खरेदी केला. यावेळी पाऊचमध्ये त्यांना चक्क कोंबडीचा पीस आढळून आला. याबाबत रूपामाता दूध डेअरीचे मार्केटिंग मॅनेजर बिभीषण माने यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी शेख यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी दाद मागण्यासाठी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाकडे व पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे ग्राहक सादेक शेख यांनी लोकमतला सांगितले.

दुध स्वच्छ, पाऊच खराब मार्केटिंग मॅनेजर बिभीषण माने यांनी डेअरीचे दूध स्वच्छ आहे, मात्र  पॉलिथीनच्या पाऊच रोलला कोंबडीचा पीस चिटकून आला असावा. यापुढे सतर्क राहून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाऊच पुरवणाऱ्या कंपनीकडे याची तक्रार केली आहे, असे स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे.

टॅग्स :milkदूधBeedबीडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग