शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आष्टीत गर्भवती महिलेच्या नातेवाईकांकडून रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 18:33 IST

यानंतर महिलेस खाजगी वाहनाने बीड येथे नेण्यात आले

ठळक मुद्देरुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने चालकाचा नकार

आष्टी : गर्भवती महिलेला पुढील उपचारासाठी बीड येथे नेण्यासाठी १०८ आरोग्य सेवेच्या रुग्णवाहिका चालकाने  रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने येण्यास नकार दिला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आष्टी येथे दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील घरडघव्हाण येथील शिल्पा परशुराम येरकर (२३) यागर्भवती महिला कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल होती. प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी तिला बीड येथे जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. यावेळी रुग्णालयाच्या बाहेर असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची नातेवाईकांनी मागणी केली. मात्र चालकाने रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने तुम्ही १०८ नंबरला फोन लावून त्यांना कल्पना द्या असे सांगत येण्यास नकार दिला. यामुळे  संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करत जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेस खाजगी वाहनाने बीड येथे नेण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पीआय माधव सूर्यवंशी यांनी रुग्णालयाकडे लागलीच धाव घेतली. दरम्यान, जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेच्या  नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाBeedबीडdoctorडॉक्टर