शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; बीडमध्ये लपविलेले २०४ कोरोना बळी झळकले पोर्टलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:32 IST

सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : उपचारातील हलगर्जीपणा आणि उपाययोजनेतील अपयश उघड होऊ नये यासाठी प्रशासन व आरोग्य ...

सोमनाथ खताळ

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : उपचारातील हलगर्जीपणा आणि उपाययोजनेतील अपयश उघड होऊ नये यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोना बळी लपवून ठेवण्याचा प्रकार केला होता; परंतु ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली. रविवारपर्यंत लपविलेल्या तब्बल २०४ कोरोना बळींची नोंद आयसीएमआर पोर्टलवर झाली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. ‘लोकमत’ने आरोग्य विभाग व प्रशासनाच्या अपयशाचा या निमित्ताने पर्दाफाश केला आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे होणारे मृत्यूसत्र थांबत नसल्याचे दिसत आहे. दुसऱ्या लाटेत तर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांच्या रांगाच लागत आहेत. असे असतानाही आरोग्य विभागाकडून कमी मृत्यू दाखविले जात होते. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने स्मशानातील आणि आरोग्य विभागाने नोंदविलेल्या आकड्यांची बेरीज केली. यात केवळ एप्रिल महिन्यात १०५ मृत्यूंची तफावत आढळली. यावरून आरोग्य विभागाकडून हे काेरोना बळी लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर ‘लोकमत’ने ९ मे रोजी वृत्त प्रकाशित करून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली. रोज ३० पेक्षा जास्त कोरोना बळींची नोंद पोर्टलवर होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल २०४ कोरोना बळी पोर्टलवर झळकले आहेत. हे सर्व बळी आरोग्य विभागाने एवढ्या दिवस लपवून ठेवल होते. विशेष म्हणजे हा आकडा रोजच वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आणखी किती कोरोना बळींची नोंद होणार, हे येणारी वेळच ठरवील.

राज्याच्या आरोग्य संचालिका म्हणतात..

सर्व माहिती अपडेट ठेवण्यासाठी वारंवार सूचना केल्या जातात. तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला असेल; परंतु मृत्यूचा आकडा खूप मोठा आहे. याबाबत मी बीड जिल्हा आरोग्य विभागाला विचारते. राज्यातील इतर जिल्ह्यांचीही माहिती घेण्याबाबत सूचना करते, असे राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त रामास्वामी यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही, तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा भ्रमणध्वनी बंद होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी व्यस्त असल्याचा संदेश पाठविला. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.

---

अशी झाली लपविलेल्या कोरोना बळींची नोंद

१० मे - ३५

११ मे - ३५

१२ मे - २०

१३ मे - ५१

१४ मे - ११

१५ मे - १६

१६ मे - ३६

एकूण - २०४

------