शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

शिरुर कासारला अजस्त्र अजगरावर ‘सर्पराज्ञी’त उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:59 IST

बीड -अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी ऊसाच्या शेतात १० फूट लांब व २५किलो वजनाचा अजस्त्र अजगर ८ डिसेंबर रोजी जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास वाईड लाइफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पकडून वनविभागाच्या मदतीने तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : बीड -अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी ऊसाच्या शेतात १० फूट लांब व २५किलो वजनाचा अजस्त्र अजगर ८ डिसेंबर रोजी जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास वाईड लाइफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पकडून वनविभागाच्या मदतीने तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले. त्यावर हे उपचार करत आहेत.अजगर आढळल्याची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरुन मिळाली. सोनवणे व अमोल ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या अजगरास पकडले.

अजगर आजारी असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने त्यास विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पराज्ञी पुनर्वसन केंद्रात वनरक्षक विजय केदार, शिवाजी आघाव यांनी दाखल केले. या अजगरावर सध्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय चौरे, डॉ. निलेश सानप हे उपचार करत आहेत. या अजगराची शुश्रूषा सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे ह्या करत आहेत.

अधिका-यांचेही सहकार्यअजगराच्या प्रकृतीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत असून लवकरच ते बरे होईल. पूर्ण बरे झाल्यानंतर या अजगरास त्याच्या मूळ अधिवासात सोडून देण्यात येईल. वनविभागाच्या अधिकाºयांचेही सहकार्य आहे.- सृष्टी सोनवणेसंचालिका, सर्पराज्ञी प्रकल्पतपासणीनंतरच होणार अजगराच्या आजाराचे निदानअजगराची हालचाल मंद झालेली आहे, त्याच्या मलमूत्राचाही उग्र वास येत आहे. अन्नही खात नसल्याने त्याच्या या बाह्यलक्षणांवरून त्यास अमेबिअसिसची लागण झाल्याचे जाणून येत आहे. त्याचे अचूक निदान करण्यासाठी त्याच्या मलमूत्राची तपासणी करावी लागणार आहे. या तपासणीनंतरच योग्य तो निष्कर्ष काढण्यात येईल.- डॉ. विजय चौरे, पशुवैद्यकीय अधिकारी