शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरकासार नगरपंचायत सुरेश धस यांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:32 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पार पाडलेली नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवण्याचा निर्णय आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील नगरपंचायत आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पार पाडलेली नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवण्याचा निर्णय आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील नगरपंचायत आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आली आहे.नगर परिषद अध्यक्ष निवडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे गटाला धक्का बसला असून, आमदार सुरेश धस गटात आनंदाचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आमदार सुरेश धस समर्थकांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. सर्वसाधारण बैठकीच्या निमित्ताने निवडणुकीची प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गणेश निºहाळी यांच्या उपस्थितीमध्ये ५ डिसेंबर रोजी पार पडली होती.१७ नगरसेवक सदस्य संख्या असलेल्या नगरपंचायतमध्ये फेरनगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजलेल्या निवडणुकीत न्यायलयाच्या निर्णयामुळे चुरस पाहयला मिळाली. आमदार सुरेश धस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेची केलेल्या नगरपंचायत मध्ये १५ नगरसेवकांनी मतदान केले होते.सुरेश धस गटाकडून मीरा गाडेकर यांनी तर धनंजय मुंडे गटाकडून विद्यमान नगराध्यक्ष रोहिदास पाटील यांनी अध्यक्षपदासाठी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. सदरील निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायलयाने १२ डिसेंबर पर्यंत घोषित करू नयेत असे आदेश दिल्यामुळे निकाल राखीव ठेवण्यात आलेला होता.१२ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात ५ डिसेंबर रोजी झालेली निवडणूक प्रक्रिया कायम राहणार असल्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मीरा गाडेकर यांना ९ तर रोहिदास पाटील गाडेकर यांना ६ मते मिळाली आहेत त्यामुळे सुरेश धस गटाच्या मीरा गाडेकर नगराध्यक्ष असणार आहेत.मीरा गाडेकर नगराध्यक्षाआ.सुरेश धस राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर शिरुर नगर परिषदेतील राष्ट्रवादीत फूट पडली होती त्यामुळे न.प. अध्यक्ष पदासाठी फेरनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये धस गटाक डून मीर गाडेकर यांनी ९ मत मिळवत धनंजय मुंडे यांच्या गटाचे रोहिदास पाटील गाडेकर यांचा पराभव केला.