गंगामसला : माजलगाव तालुक्यातील शिंपेटाकळी येथे अज्ञात आजाराने १६ वासरे तडफडून दगावली़ ही खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली़शिंपेटाकळी परिसरात पशुपालक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे़ शिंपेटाकळी येथे शुक्रवारी रात्रीपासून गुरे दगावण्यास सुरूवात झाली़ रविवारपर्यंत हा आकडा १६ पर्यंत पोहचला़ गुरे दगावण्याचे नेमके कारण समजू शकले नाही़ दगावण्यापूर्वी वासरांना कुठला आजारही जडलेला नव्हता़ असे असतानाही अचानक वासरे दगावली कशी ? या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे़दरम्यान, शेतकऱ्यांनी सांगितले की, मोठी गुरे सुरक्षित आहेत परंतु वासरे दगावल्याने मोठे नुकसान झाले आहे़ दुष्काळी स्थितीमुळे गुरांना जगविण्यासाठी कसरत होत आहे़ त्यात अज्ञात कारणावरून वासरे दगावल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत़ (वार्ताहर)
शिंपेटाकळीत १६ वासरे तडफडून दगावली
By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST