शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाभ दिलेल्या रुग्णसंख्येचा दावा शेटेंच्या अंगलट ?; २०१५ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातील प्रकरणांच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 20:13 IST

२०१५ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची आ. प्रकाश सोळंके यांची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आ.प्रकाश सोळंकेंची मागणी

ठळक मुद्दे तत्कालीन मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्यावर गंभीर आरोप

माजलगाव : मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात मार्च 2015 ते ऑक्टोंबर 2019 या कालावधीत रूग्णांना वितरीत करण्यात आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप आ. प्रकाश सोळंके यांनी केला आहे. तसेच याची चौकशी प्रधान सचिव आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांनी एका पत्राव्दारे केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी जाहिरपणे प्रसार माध्यमात मार्च 2015 ते ऑक्टोंबर 2019 या कालावधीत 21 लाख रूग्णांना तब्बल 1500 कोटी रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन वितरीत केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वेबसाईटवर पाच वर्षात सुमारे 54 हजार रूग्णांवर केवळ 526 कोटी रूपयांची मदत वितरीत केली गेल्याचे नमुद केलेले आहे. या सदंर्भात  मागील पाच वर्षात किती रूग्णांना ? किती रूपये ? मदत वितरीत केली गेली, याची सखोल चौकशी आरोग्य प्रधान सचिव आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात यावी. यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आ. सोळंकेकडे सांगलीच्या रूग्णसेवकांने मांडले होते गार्‍हाणेमिरज जिल्हा सांगली येथील रूग्णसेवक स्वरूप काकडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातील गैरकारभार विषयी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे दि.10 नोव्हेंबर 2020 रोजी लेखी स्वरूपात तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, अनेक मृत रूग्णांच्या नांवे पैसे वितरीत केले गेले आहेत. यामुळे तालुका निहाय व हॉस्पिटल निहाय किती मदत वितरीत केली गेली याची चौकशी व्हावी. या संदर्भात श्‍वेतपत्रिका काढावी.

रूग्णांना लाभ दिल्याचा दावा शेटेंच्या अंगलट !दि.1 जानेवारी 2015 ते दि.31 मार्च 2019 दरम्यान एकूण 85 हजार 689 रूग्णांनी अर्थसहाय्य मिळण्याकरिता अर्ज केले होते. त्यातील 53 हजार 762 रूग्णांना अर्थसहाय्यांचा लाभ मिळाला. या लाभ मिळालेल्या रूग्णांना एकूण 526 कोटी रूपयांचे अर्थसहाय्य झाले असल्याची माहिती स्वरूप काकडे यांनी निवेदनात दिलेली आहे. परंतू शेटें यांच्याकडून 21 लाख रूग्णांना 1500 कोटी रूपयांचे अर्थसहाय्य दावा केला होता. हाच दावा त्यांच्या कक्ष विभागातील अनागोंदी समोर आणणारा ठरत असल्याची चर्चा आहे.

प्रधान सचिवच काय ? तर सिबीआय मार्फत चौकशी करा : शेटेमुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फंत खर्‍या अर्थाने गरजू रूग्णांना अर्थसहाय्य झाले. राज्यात सर्वाधिक अर्थसहाय्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी कक्षअधिकारी असतांना मिळालेले आहे. आ.प्रकाश सोळंकेंची मागणी ही निरर्थक आहे. त्यांनी चौकशी प्रधान सचिवामार्फतच नव्हे तर सिबीआय, इंटरपोल मार्फत करावी.- ओमप्रकाश शेटे, माजी कक्षप्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी

टॅग्स :Prakash Solankeप्रकाश सोळंकेBeedबीडState Governmentराज्य सरकार