शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

शंभो, लागली तुझी आस, उघड दार देवा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांनुसार मंदिरे अद्यापही बंद आहेत. जिल्ह्यासह शहरातील मंदिरे बंद असल्याने भाविकांची कुचंबना होत ...

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांनुसार मंदिरे अद्यापही बंद आहेत. जिल्ह्यासह शहरातील मंदिरे बंद असल्याने भाविकांची कुचंबना होत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असले तरी मंदिरे उघडण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे बीड शहराचे ग्रामदैवत कंकालेश्वर आणि ग्रामदेवता खंडेश्वरी मातेसह इतर मंदिरांमध्ये दर्शन करायला कधी मिळणार, याची आस भक्तांना लागली आहे.

मंदिरे बंद असल्याने पुजारी, परिसरात पान-फुले, नारळ, पूजेचे साहित्य विकणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसह शहरांतर्गत प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांनाही आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याने दुकाने, हॉटेल ठरावीक वेळेसाठी उघडल्याने दिलासा मिळाला असला तरी दिनचर्येनुसार आपली श्रद्धा अर्पित करण्यासाठी मंदिराचे द्वार बंदच आहे. बीड शहरात असलेले तेराव्या शतकातील कंकालेश्वर मंदिर हेमाडपंथी असून भग्व ऋषींनी उभारलेले स्वयंभू मंदिर बीडकरांच्या आस्थेचे प्रतीक आहे. कोरोनाच्या आदी येथे दररोज किमान ३०० भाविक स्थानिक तसेच ज्योतिर्लिंग दर्शन व पर्यटन करणारे ५०-६० पर्यटक बीडमधील कंकालेश्वर मंदिर पाहण्यासाठी व दर्शनासाठी थांबतात. इतिहासाची साक्ष देणारे हे मंदिर शाळकरी मुलांच्या सहलीत समाविष्ट असते. मात्र सोळा महिन्यांपासून मंदिराची द्वारे बंद आहेत; तर यावर अवलंबून असणारे व्यावसायिक आणि भाविकांचे मंदिर कधी उघडणार याकडे लक्ष लागले आहे.

---------

पूजा, अर्चना, मंदिर परिसराची झाडलोट, दिवाबत्ती करणे तसेच सामान्य भाविकांना पूजा, प्रार्थना, अभिषेक करता यावा म्हणून सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत नियमांच्या अधीन राहून सर्व मंदिरे उघडावीत. भाविकांनी कळसाचे दर्शन कुठवर घ्यावे? मंदिरात ध्वनिक्षेपकाद्वारे पूजा करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी. - जयसिंह चुंगडे, बीड.

------

हिंदू देेवस्थानचे दरवाजे सर्वांकरिता निर्बंध लावून खुले करावेत. आमचे मंदिर आमची श्रद्धा आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समिती व भाविक समन्वयाने करतील. शासन, प्रशासनाने भक्तांच्या भावना लक्षात घ्याव्यात. - शिवाजी जाधव, बीड.

-----------

सरकारने मंदिर सुरू करणे गरजेचे आहे. पुजाऱ्यांची उपासमार होत आहे. अभिषेक, संकल्प, दक्षिणा, कालसर्पशांती, अन्नशांती बंद असल्याने उत्पन्नाचा स्रोत खालावला आहे. बाहेरचे भाविक, पर्यटक मंदिर पाहण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी येतात. त्यांचेही येणे सध्या बंद आहे. मंदिरे सुरू करावीत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. मंदिरे सुरू करण्याची गरज आहे.

-- संजय गुरव, पुजारी, कंकालेश्वर मंदिर, बीड.

--------------

पूजेसाठी पानफूल, बेलफूल, हार, उद्बत्ती, नारळ विक्रीतून कसेतरी उत्पन्न मिळत होते. या व्यवसायातून आत्मिक आनंद मिळत होता. सोळा महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने पर्याय शोधवा लागला. - चंद्रकांत एडके, बीड.

------

मंदिरे बंद असल्याने हारफुले विकत नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमही बंद आहेत. त्यामुळे फूलविक्रेत्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मंदिरे सुरू झाली तर आमच्यासह मंदिरात पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य विक्रीच्या व्यवसायांला आधार मिळेल. - राजू घाडगे, बीड.

===Photopath===

200621\img_20210620_142647_14.jpg