अंबाजोगाई शहरातील चौसाळकर कॉलनी परिसरात ४५ वर्षीय पीडित महिला आपल्या पतीच्या निधनानंतर एकटी घरी राहते. तिच्या घराच्या बाजूलाच तिचा सावत्र मुलगा राहतो. नेहमीप्रमाणे ती महिला तिच्या घरासमोर सकाळी झाडून घेत होती. यावेळी तिच्या नातेवाइकाचा नोकर अनिस शेख त्या महिलेजवळ गेला. त्याने ती एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन त्याने या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. तिच्याशी जबरदस्ती करत असताना त्या महिलेचा आरडाओरडा ऐकून तिच्या घरी आलेली पाहुणी तिची बहीण घरातून धावत आली. बहिणीला पाहताच अनिस शेख पळून गेला. पीडित महिलेने अंबाजोगाई पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी या महिलेच्या फिर्यादीवरून अनिस शेख याच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय करत आहेत. अंबाजोगाई शहरातील उच्चभ्रू वस्तीत असे गैरप्रकार होऊ लागल्याने या परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जातीवाचक शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST