शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘वीजरोधक यंत्रणा बसवणार’

By admin | Updated: March 17, 2017 23:58 IST

परळी : वारंवार एकाच जागेवर होणाऱ्या वीज कोसळण्याच्या घटनांना रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही गावांमध्ये वीजरोधक यंत्रणा बसविण्यात येणार

परळी : वारंवार एकाच जागेवर होणाऱ्या वीज कोसळण्याच्या घटनांना रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही गावांमध्ये वीजरोधक यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. अवकाळी पावसामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतला. बैठकीस आ. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि. प. चे सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा कृषी अधिकारी रमेश भताने, सर्व तालुक्याचे उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, सा. बां. कार्यकारी अभियंता एन. टी. पाटील, नाईकवाडे, कृषी, जलसंधारण, वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, परळीच्या कौठळी शिवारात, तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारंवार एकाच जागेवर वीज कोसळून जीवितहानी होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यावर उपाय म्हणून वीजरोधक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कौठळीसह तालुक्यात दहा ते बारा ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पिकांचे पंचनामे पूर्ण करून फळबागांच्या नुकसानीचे प्रस्ताव स्वतंत्रपणे पाठविण्यास सांगितले आहे. वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना चार लाख व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख असे एकूण सहा लाख रु पये मदत देण्यात आली असून जखमींनाही मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पिकांचा नुकसानीचा अहवाल लवकर पूर्ण करून त्यांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिल्याचे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)