शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
2
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
3
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
4
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
5
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
6
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
7
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर
8
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
9
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
10
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
11
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
12
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
13
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
14
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
15
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
16
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
17
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
18
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
19
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
20
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग

एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे, कोरोनाकाळात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

बीड : शहरातील विविध भागात एकटे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांचे कोरोना काळात हाल झाल्याची परिस्थिती आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील ...

बीड : शहरातील विविध भागात एकटे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांचे कोरोना काळात हाल झाल्याची परिस्थिती आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील त्यांच्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नसून एकाही ठाण्यात त्यांच्या हद्दीतील वृद्धांच्या संख्येची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोना काळात या एकट्या राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे असून, त्यांना आधाराची गरज आहे.

जिल्ह्यातील शहरांमध्ये अनेक वृद्ध एकटे राहटेच राहात आहेत. यामध्ये महिला तसेच पुरुषांचा समावेश आहे. मुले-सुना नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. काहींचे परदेशात असतात. त्यामुळे या वृद्धांना कोरोनाकाळत अनेक गोष्टींची गरज असतानादेखील त्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले. दरम्यान, अशा वृद्ध दाम्पत्यांवर लक्ष ठेवून त्यांना लुटण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत वृद्धांकडून व्यक्त केले जात आहे.

औषधी आणण्याचीही सोय नाही

लॉकडाऊनच्या काळात मेडिकल सुरू होते. मात्र, वाहतूक व्यवस्था बंद असल्याने वृद्धांची अवस्था बिकट झाली होती. काहीवेळा शेजारी व नातेवाईकांनी औषधी आणण्यासाठी मदत केली, तर काही वेळा त्यांनाच पायपीट करावी लागली.

पोलीस ठाण्यात वृद्धांची नोंद नाहीच

पोलीस ठाणे हद्दीतील एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या मदतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, तशा पद्धतीने कोणत्याच शहरातील वृद्धाची नोंद केली असल्याची माहिती मिळू शकली नाही.

पोलिसांकडून कायम होते मदत

पोलीस ठाण्यात वृद्ध नागरिक काही कारणास्तव आले तर, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही केली जाते. तसेच वृद्धांना कायम मदत करण्याचा हेतू पोलीस प्रशासनाचा असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

आयुष्यात एकदाही पोलिसांकडून विचारणा नाही

मुलगा व सुना बाहेगावी राहात असल्याने एकटाच राहतो. इतर वेळा सहसा त्रास होत नाही. पण कोरोना व लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणी समोर उभ्या आहेत. पैसे असूनदेखील जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत. पोलीस ठाण्यात याविषयी मदत मागितली नाही. परंतु, शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी मदत केल्यामुळे दोन्ही लाटेत आम्ही सुखरूप आहोत.

एक वृद्ध, केज

मुले सुनांना घेऊन वेगळे राहतात. ते माझ्याजवळ राहत नाहीत. काही व्याधी नसल्यामुळे अद्याप कसला त्रास नाही. मात्र, माझ्यासारख्या अनेक वृद्धांचे हाल आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाही. मदत कोणाकडे मागावी, हेदेखील त्यांना कळत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

एक वृद्ध, बीड