शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगडाचे महत्त्व कमी करण्यासाठी जन्मगावाचा काढला शोध - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:03 IST

मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पुजा करू दिली नाही म्हणून ते आता विठ्ठलाचा जन्म कुठं झाला ? याचा शोध घेत आहेत. मात्र, भगवानगडाचे महत्त्व कमी करण्यासाठी ‘काहींनी’ स्वार्थासाठी बाबांच्या जन्मगावाचा शोध काढला, अशी उपहासात्मक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली.

पाटोदा : मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पुजा करू दिली नाही म्हणून ते आता विठ्ठलाचा जन्म कुठं झाला ? याचा शोध घेत आहेत. मात्र, भगवानगडाचे महत्त्व कमी करण्यासाठी ‘काहींनी’ स्वार्थासाठी बाबांच्या जन्मगावाचा शोध काढला, अशी उपहासात्मक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली.

संत भगवान बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोमवारी येथे आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, राजेंद्र जगताप, बाळासाहेब आजबे, चंपावती पानसंबळ, रोहिदास पाटील, शिवभूषण जाधव, महेंद्र गरजे, रामकृष्ण बांगर आदी यावेळी उपस्थित होते.

ह.भ.प. रामकृष्ण रंधवे, एकबाल पेंटर, प्राचार्य दत्तात्रय आघाव, दीपक नागरगोजे, संदीप पवार, बाळासाहेब आवारे आदींचा यावेळी मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . मुंडे म्हणाले की, भगवानगडावर मी दगड झेलले, मात्र बाबांनी उभारलेल्या गडाचे महत्त्व कमी होईल, अशी पापकृती मी कधी केली नाही. असा विचार डोक्यात येणे म्हणजे बाबांविषयी प्रतारणा केल्यासारखं आहे.

‘यांना’ गडाचं राजकीय व्यासपीठ करू नका, असं विनवणी केली गेली तर यांनी बाबांचं जन्मगाव राजकीय व्यासपीठासाठी शोधलं. गड बाबांनी उभारला. गडाचं महत्त्व कमी होऊ देऊ नका. जे असं करतील ते नेस्तनाबूत होतील. पाटोदा तालुका भाग्यवंतांचा तालुका आहे. या तालुक्याने संत भगवानबाबा, संत वामनभाऊंना जन्म दिला. या संतांनी शिक्षणाची शिकवण सर्व समाजाला दिल्याचे ते म्हणाले.उसतोड मजुरांच्या प्रश्नाला हात घालत धनंजय यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मजुरांच्या प्रश्नासाठी पूर्वी तीन वर्षांनी धोरण आढावा घेण्याचं ठरलं होतं ‘यांनी’ ते पाच वर्षांवर नेऊन ठेवलं. महापुरुष, संत महंतांना जाती धर्मात वाटू नका. सर्व समाजाने येऊन एकत्रित पुण्यतिथी जन्मोत्सव साजरे करावेत, असे आवाहन मुंडे यांनी केले.