शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

शाळा दुरुस्ती हा ‘ड्रिम प्रोजेक्ट’- प्रीतम मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:27 IST

बीड जिल्ह्यातील विद्यामंदिरे ही चांगली, सुस्थितीत असली पाहिजेत. मुलांना प्रसन्न वातावरणात शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी जि.प.च्या मोडकळीस आलेल्या शाळा दुरुस्ती करणे हा आपल्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. येत्या १० दिवसात शाळा दुरुस्तीचा पुर्ण आढावा सादर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी शाळा कायापालट समितीच्या बैठकीत दिला.

बीड : जिल्ह्यातील विद्यामंदिरे ही चांगली, सुस्थितीत असली पाहिजेत. मुलांना प्रसन्न वातावरणात शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी जि.प.च्या मोडकळीस आलेल्या शाळा दुरुस्ती करणे हा आपल्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. येत्या १० दिवसात शाळा दुरुस्तीचा पुर्ण आढावा सादर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी शाळा कायापालट समितीच्या बैठकीत दिला.

जिल्ह्यातील जि.प.च्या अनेक शाळांच्या खोल्या मोडकळीस आल्या आहेत. काहीचे छत खराब झाले आहेत तर काहीचे पत्रे उडून गेले आहेत. अशा प्रकाराच्या तक्रारी खा.मुंडे यांच्याकडे आल्या. त्यानंतर महिन्याभरापुर्वी याबाबत त्यांनी विशेष बैठक घेवून या शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शाळा कायापालट समितीची स्थापना करीत अनेक बैठका घेतल्या. जिल्ह्यातील ३४४ शाळांच्या खोल्या दुरुस्त करण्यासाठी आढावा त्यांना देण्यात आला होता. त्यानंतर या समितीने योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या त्यांनी सुचना दिल्या होत्या आणि त्याचवेळी १ कोटी रुपयांचा निधी खासदार फंडातून या कामांसाठी दिला होता. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कायापालट समितीची बैठक खा.डॉ.मुंडे यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली.

३४४ शाळा खोल्या दुरुस्तीसाठी २.२५ कोटी रुपये लागणार म्हणून सांगून या ठिकाणी या बैठकीत केवळ १३७ शाळांसाठी ४ कोटी रु. जवळपास निधी लागत असल्याचे सांगितले जात आहे. एवढी तफावत होती कशी? खोल्याची संख्या कमी आणि निधीची रक्कम जास्त कशामुळे होत आहे, असा प्रतिसवाल मुंडे यांनी अधिकाºयांना केला. उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली. बैठकीस जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्ष जयश्री मस्के, शिक्षणसभापती राजेसाहेब देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, मुरलीधर ढाकणे, गौतम नागरगोजे, संदिप ढाकणे, जयश्री मुंडे, राणा डोईफोडे, डॉ.अभय वनवे, भुषण पवार आदी उपस्थित होते.

नवीन शाळा खोल्यांसाठी निधी नाहीनवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी मोठा निधी दाखवण्यात आलेला आहे. मात्र नवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी माझा निधी नाही आणि त्यासाठी मी निधी देणारही नाही.ज्या शाळा खोल्या नादुरुस्त आहेत यासाठी हा निधी मी देत आहे. त्यामुळे संरक्षण भिंत, नवीन शाळा खोल्या यासाठी हा निधी वापरू नये, ज्या अधिकारी, अभियंतानी या कामात ढिसाळपणा आणि गोंधळ घातला आहे, अशा अधिका-यांनी लेखी उत्तर पालकमंत्री, कायापालट समितीला द्यावे, असा दम त्यांनी यावेळी दिला. येत्या १० दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या.