परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ही दिनांक २५ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली होती. मात्र राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेत आता ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी शाळांना १० एप्रिलपर्यंत द्वितीय मुदतवाढ देण्यात आली आहे.
असा करावा अर्ज
डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाईटवर वेळापत्रक, माहितीपुस्तीका आणि अर्ज उपलब्ध आहे. इच्छुकांनी या संकेतस्थळाचा वापर परून आवश्यक माहिती जाणून घ्यावी.
कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली परीक्षा
१) मागील वर्षीपासून कोरोना संसर्ग अद्यापही थांबलेला नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष नावालाच सुरू झाले. नोव्हेंबरमध्ये शाळा सुरू झाल्या आणि जानेवारीत बंद करण्याची परत वेळ आली.
२) नियमित वार्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन विस्कळीत झालेले असताना शिष्यवृत्ती परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्यात आल्या. याला कोरोनाचे कारण सांगितले जात आहे.
३) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने शिक्षण विभागाला स्थानिक पातळीवर नव्याने नियोजन करावे लागेल. मात्र या वाढीव कालावधीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास, सराव करण्यासाठी अवधी मिळाला आहे.
४) १० एप्रिलपर्यंत नियमित शुल्क व आवेदपत्र भरता येणार आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार येणार नाही.
शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे
ऑनलाइन अर्ज भरता येणार १० एप्रिलपर्यंत