शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी अनुदान वाटपामध्ये घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. अद्यापही अनेक गावे अनुदानापूसन वंचित आहेत. तसेच अनेक ...

ठळक मुद्देअनेक गावे वंचित : शासनाकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप; ग्रामस्थांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. अद्यापही अनेक गावे अनुदानापूसन वंचित आहेत. तसेच अनेक ठिकाणी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करत संबंधित तलाठी व अधिकाºयांविरोधात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. शेतकºयांना झालेल्या नुकसान भरपाईपोट पहिल्या टप्प्यात ६८ कोटी तर दुसºया टप्प्यात १०२ कोटी रुपये अनुदान देण्यात आले होते. या माध्यमातून जवळपास १ लाख ६२ हजार शेतकºयांपर्यंत अनुदान रक्कम वाटप करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ज्या व्यक्तींच्या नावे शेतीच नाही, किंवा ज्यांचे क्षेत्र कमी असून त्यांचे क्षेत्र कागदोपत्री जास्त दाखवून अनुदान लाटल्याचा गैरप्रकार समोर आला आहे.अनुदान अद्यापही मिळाले नाहीखरीप हंगाम संपत आला, तरी देखील मागील वर्षीच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारे बोंडअळी अनुदान अजून मिळाले नाही. पाऊस नसल्यामुळे या हंगामातील पिके हातची गेली आहेत. या परिस्थितीमध्ये बोंडअळी अनुदान हा शेतकºयांसाठी आधार ठरणार होता. मात्र, रबी हंगाम आला तरी देखील मागील वर्षातील अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच शासनाकडून दिशाभूल होत असल्याचे नेकनूर परिसरातील अंधापुरी येथील शेतकरी काना टेकडे यांनी सांगीतले.असा झाला घोटाळाबीड तालुक्यातील रामगांव, नाथापूर, लोणी, शहजानपूर सह इतर गांवातील अनेक शेतकºयांची नावे एकापेक्षा जास्त अनुदान यादीमध्ये टाकण्यात आली आहेत. एक खाते क्रमांक अनेकांना देण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा सहकारी बँके च्या माध्यमातून अनुदान उचलण्यात आलेले आहे.८/अ च्या उताºयानुसार क्षेत्र कमी असताना देखील काही गुंठ्यांमध्ये ते वाढवण्यात आले आहे.हा प्रकार लपवण्यासाठी ज्या शेतकºयांचे क्षेत्र जास्त आहे, त्यांचे कापूस लागवडीखालील क्षेत्रांमध्ये घट करण्यात आली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रफळ असणाºयाला जास्त फायदा आणि जास्त क्षेत्र असणारे अनुदानापासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.त्याचसोबत जे भूमिहीन असणाºयांच्या नावे देखील शेती असल्याचे दाखवण्यात आलेली आहे. याची संपूर्ण माहिती प्रशासनास देण्यात आल्याचे संबंधित गावांमधील शेतकºयांनी सांगितले.तसेच असा प्रकार सगळ््या जिल्हायात झाल्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे दोन टप्प्यात वाटप केलेल्या बोंडअळी अनुदानाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूस