शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परळीचा सौरभ नावंदे दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने केंद्रीय कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवक ...

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने केंद्रीय कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते २०१७-१८ व २०१८-१९ च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्रालय सचिव उषा शर्मा व संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतातील निवासी समन्वयक डियर्ड बायोडड उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात सन २०१७-१८ साठी १४ व २०१८-१९ साठी ८ अशा २२ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सौरभला सन २०१७-१८ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कार रु. एक लाख, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सौरभ नावंदे याने २०१७ मध्ये क्वालालंपूर येथे आयोजित 'राष्ट्र मंडल युवा शिखर संमेलना’त आणि २०१८ मध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसभेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याला महाराष्ट्र शासनानेही यापूर्वी यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सौरभने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सौरभचे अभिनंदन केले. तसेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेकांनी सौरभचे अभिनंदन केले.

सौरभ हा सेवानिवृत्त क्रीडाधिकारी सुभाष नावंदे व औरंगाबाद जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांचा मुलगा असून, प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे व आदर्श शिक्षक अशोक नावंदे, सामाजिक कार्यकर्ते रामलिंगअप्पा नावंदे यांचा तो पुतण्या आहे.

170821\17_2_bed_10_17082021_14.jpeg

परळीचा सौरभ नावंदे यास दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित करण्यात आले.