शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सराटेवडगावमध्ये १६ कोंबड्या; २ कावळ्यांच्या मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 13:32 IST

आष्टी तालुक्यातील घटना असून मृत कोंबड्यांचे सॅम्पल पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत

ठळक मुद्देमागील पाच दिवसात १०० कोंबड्यांचा मृत्यू

- अविनाश कदम आष्टी : जगभरासह देशामध्ये सध्या कोरोना महामारिचे संकट सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.आष्टी तालूक्याच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेड तालुक्यातही बर्ड फ्लू ने शिरकाव केला आहे.मृत्यु झालेल्या कावळ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.आष्टी तालुक्यातील शिरापूर येथेही शेकडो कोबड्या मरण पावल्या आहेत.मागिल ४ ते ५ दिवसांपासून सराटेवडगांव येथील शेतकरी व पोल्ट्री मधील १०० कोंबड्या व २ कावळे मरण पावल्याने घटनास्थळी पशुवैद्यकीय पथक दाखल झाले आहे. यावेळी १६ कोंबड्या मृत आढळून आल्या असून सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

आष्टी तालुक्यातील सराटेवडगांव येथे दि.१६ रोजी एक तर दि.१७ रोजी एक असे एकूण २ कावळे मृत झाल्याची घटना घडली आहे. तसेच रावसाहेब मल्हारी गजघाट यांच्या पोल्ट्री मधील १६ कोंबड्या, बापूराव गायकवाड यांच्या पोल्ट्रीतील  १० ते  १२ कोंबड्या अचानक मरण पावल्या असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या मृत कोंबड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून घटनास्थळी पशुवैद्यकीय पथकाचे डॉ.एस.के.गदादे, डाॅ.एस.डी.शिंदे, सहाय्यक परिचर वांढेकर, सहाय्यक परिचर चौधरी यांची टिम व सरपंच राम बोडखे दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे.

आतापर्यंत १०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहेगावामध्ये मागिल आठ दिवसांपासून कोंबड्यांचा मृत्यू होत आहे.दि.१६ व १७ रोजी प्रत्येक एक एक म्हणजे २ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.गावातील शेतकरी व पोल्ट्री फार्म मधील जवळपास १०० पेक्षा जास्त पक्षी मृत झाले आहेत.- राम बोडखे ( सरपंच सराटेवडगांव - आनंदवाडी ) 

अहवाल आल्यानंतर कारण कळेलसराटेवडगांव येथील शेतकरी रावसाहेब गजघाट यांच्या पोल्ट्री मधील १६ कोंबड्या मृत आढळून आल्या असून या कोंबड्यांचे सॅम्पल प्रादेशिक रोग प्रयोगशाळा पुणे येथे पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल  - डॉ.एस.के.शिंदे ( पशुवैद्यकीय अधिकारी )

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूBeedबीड