राजा शिवछत्रपती परिवाराने प्रेरणादायी शिवगीत सादर केले. सर्व उपस्थितांनी गडकिल्ले संवर्धन करण्याबाबत शपथ घेतल्यानंतर दोन गटांत विभागणी केली. एका गटाने बाहेरील दर्शनी भागात व एका गटाने आतील बाजूस स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी सरसावले. राजा शिवछत्रपती परिवाराच्या मावळ्यांनी ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यातील उपद्रवी गवत काढत स्वच्छता केली. ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारा ठिकाणी पाणी जमा होत असल्याने आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता. त्यामुळे या मावळ्यांनी दगड व मातीभराई करून आतमध्ये जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी एक रस्ता तयार केला व साचलेले पाणी काढून दिले. ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्याच्या दोन्ही भागांत साफसफाई करत स्वच्छता केली. राजा शिवछत्रपती परिवारासोबत किल्ले धारूर शहरातील स्थानिक तरुणांनी ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यात स्वच्छता अभियान राबविल्याने परिसर स्वच्छ झाला.
020721\02bed_4_02072021_14.jpg~020721\02bed_3_02072021_14.jpg