शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील रेवकी गावाकडे जात असताना अवैध वाळूवाहतूक करणाºया ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये एक ...

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील रेवकी गावाकडे जात असताना अवैध वाळूवाहतूक करणाºया ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेनंतर नातेवाईक, ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद करावी, यामागणीसाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

अजिनाथ बाबूराव बाबरे (४५ रा.रेवकी) असे अपघातात ठार झालेल्यांचे नाव असून अशोक थोरात हे गंभीर जखमी आहेत. हे दोघेही दुचाकीवरून (एमएच २३ एव्ही ५८०४) गावाकडे जात होते. तलवाडा रोडवरील रेवकी फाटा येथे समोरून येणाºया अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये अजिनाथ बाबरे हे ट्रॅक्टरखाली गेल्याने जागीच ठार झाले तर थोरात गंभीर जखमी झाले.

दरम्यान, ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करून तालुक्यात होत असलेला अवैध वाळू उपसा बंद करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपजिल्हा रूग्णालयासमोरच ठिय्या मांडला. ऐन रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच जि.प.सदस्य विजयसिंह पंडित, अभिजित पंडित यांनी आंदोलनाकडे धाव घेतली. ग्रामस्थांना अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.