बीड : गेवराई तालुक्यातील कोल्हेर फाट्यावरून गेवराईकडे वळणाऱ्या पाटाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेले नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांना ढकलून एक ब्रास वाळू ट्रॅक्टरसह नेल्याचा गुन्हा मंगळवारी (दि. १५) सायंकाळच्या सुमारास घडला. जाधवर यांच्या फिर्यादीवरून कैलास चक्कर व १० ते १५ अनोळखी इसमांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि साबळे हे करीत आहेत.
------
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये चोरी
बीड : शहरातील नगर रोड भागात असलेल्या शासकीय तंत्र प्रशालेतील इलेक्ट्रॉनिक रूममधील जड साहित्य कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक मेन्टेनन्स विभागाच्या प्रमुख तृप्ती प्रशांत महाले यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक शेजुळ करीत आहेत.
---------------
परळीच्या विद्यानगरमधून कार चोरली
बीड : परळी शहराच्या विद्यानगर भागात राहणारे व्यापारी अभय गहिनीनाथ रोडगे यांच्या मालकीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. १४ जून रोजी रात्री दहा ते १५ जून रोजी पहाटेदरम्यान हा गुन्हा घडला. रोडगे घरासमोर उभी केलेल्या कारच्या दरवाज्याचा लॉक तोडून ३५ हजार रुपये किमतीची कार चोरीप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.