नियमांचे उल्लंघन
बीड : कोरोना संदर्भात नियम व आठवडी घालत आठवडी बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु व्यापारी, व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांमधून कोरोनाचे सर्वच नियम पायदळी तुडविले जात आहेत. याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.
कार्यालय अस्वच्छता
बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. पालिकेच्या मदतीने या ठिकाणी मोहीम राबवण्याची गरज आहे. अस्वच्छतेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्व स्वच्छता करून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अवैध प्रवासी वाहतूक
केज : शहरातील बसस्थानक, कळंब रोड, बीड रोड, धारूर रोड या मार्गावरून खासगी वाहनधारक वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून अवैध वाहतूक करीत आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. पोलीस व आरटीओ विभागाने संयुक्त मोहीम राबवत कारवाई करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे.
स्थानकात निर्जंतुकीकरण होईना
अंबाजोगाई : एसटी महामंडळाच्या बसेस सॅनिटायझेशन करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. चालक व वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहाचेही निर्जंतुकीकरणही होईनासे झाले आहे.