शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील दांडीबहाद्दर ९ डॉक्टरांची वेतन कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:39 IST

लोकमत इम्पॅक्ट बीड : स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात ओपीडीमध्ये डॉक्टर हजर नसल्याने रुग्णांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागत होते. याबाबत 'लोकमत'ने ...

लोकमत इम्पॅक्ट

बीड : स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात ओपीडीमध्ये डॉक्टर हजर नसल्याने रुग्णांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागत होते. याबाबत 'लोकमत'ने शुक्रवारी रिॲलिटी चेक करून या प्रकाराचा पर्दाफाश केला. यावर दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन तब्बल नऊ डॉक्टरांचे वेतन कपात करण्यात आले आहे. आरोग्य उपसंचालकांच्या आदेशानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ही कारवाई केली आहे, याने दांडीबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ओपीडीमध्ये बसत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे सामान्यांचे हाल होत होते. हाच धागा पकडून 'लोकमत'ने गुरुवारी तपासणी करून शुक्रवारी वृत्त प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर खुद्द जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी राऊंड घेतला. यात मानसोपचार तज्ज डॉ. सुदमा मोगले व कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. मीनाक्षी साळुंके हे दोघे दोन दिवस नेहमीप्रमाणेच न सांगता गायब होते. त्यानंतर नेत्रतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाघ, भूलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ. अर्जुन तांदळे यांनीही दांडी मारली. यांच्याबरोबरच आयुषही मागे नव्हता. डॉ.सचिन वारे, डॉ.वैशाली कदम, डॉ.हालिमा समरीन, डॉ.फारोखी आयमन यांनी देखील विभाग वाऱ्यावर सोडला होता. या सर्वांचे गैरहजर असलेल्या दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत. या कारवाईने दांडीबहाद्दरांचे धाबे दणाणले असून यापुढे कामात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उपसंचालकांकडून सीएस, एसीएसची कानउघाडणी

'लोकमत'च्या वृत्तानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी सीएस व एसीएस यांची चांगलीच कानउघाडणी केली. व्हिडीओ कॉलवर राऊंड घेतला. तसेच दांडीबहाद्दरांचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले. हलगर्जी करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचना दोन्ही अधिकाऱ्यांना दिल्याचे डॉ.माले म्हणाले. तसेच यापुढे डॉक्टर गैरहजर दिसल्यास एसीएसचा अहवाल शासनास पाठविणार असल्याचेही त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.

---

विभागात गैरहजर असणाऱ्या ९ डॉक्टरांचे वेतन सीएसच्या स्वाक्षरीने पत्र काढून कपात करण्यात आलेले आहे.

डॉ. सुखदेव राठोड, अति.जिल्हा शल्यचिकित्सक बीड