शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त सजली शिवमंदिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:16 IST

महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिवंमदिरे सजली असून ठिकठिकाणी सप्ताह, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. परळी, चाकरवाडी, बीड तसेच अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात महाशिवरात्री यात्रेचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देयात्रेचे आयोजन : विविध धार्मिक कार्यक्रम

बीड : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिवंमदिरे सजली असून ठिकठिकाणी सप्ताह, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. परळी, चाकरवाडी, बीड तसेच अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात महाशिवरात्री यात्रेचे आयोजन केले आहे.तसेच यात्रेनिमित्त भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सोमेश्वर, पुत्रेश्वर, लोहकरेश्वर, जटाशंकर, बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील काशी विश्वेश्वर मंदिरात देखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी राहणार आहे.आज कनकालेश्वराला महारुद्राभिषेक, रात्री आतषबाजीबीड शहराचे ग्रामदैवत श्री कनकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जोरदार तयार केली आहे. शुक्रवारी चार वाजेपासून महारु द्राभिषेक होणार आहे. रात्री कीर्तन व भजन होईल. त्यानंतर बारा वाजता फळे, दही, दूध, मध, उसाच्या रसाचा अभिषेक होतो. तर हरिद्वार येथील गंगेचे पाणी,१००८ बेलाची पाने, जाई, जुई, गुलाब, निशिगंध, कमळ फुलांसह अत्तर स्नान, चंदन स्नान होईल. रात्री बारानंतर ११ पुरोहितांच्या उपस्थितीत लघुरूद्र अभिषेक सोहळा होणार आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खाद्यपदार्थ तसेच खेळण्यांची दुकाने लागली आहेत. महाशिवरात्रीला रात्री ८.३० वाजता शोभेची दारू उडविण्यात येणार आहे. कल्याण महाराज गुरव, संजय महाराज गुरव, प्रभाकर महाराज गुरव, चंद्रकांत गुरवसह विश्वस्तांच्या वतीने मंदिर परिसरात यात्रेनिमित्त व्यवस्था केली आहे.शिवशक्ती गडावर यात्राबीडपासून १८ तर पाटोदा येथून २० कि.मी अंतरावर असलेल्या उंखडा येथे शिवशक्ती गडाचे भव्य काम करण्यात आलेले आहे. येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरविण्यात येत आहे. या यात्रेस बीड तसेच डोंगरिकन्ही गटातील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जि.प.सदस्य अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांनी केले आहे. येथे भगवान शंकराचे मोठे मंदिर बांधण्यात आले असून आगळे-वेगळे शिखरही पहायला मिळते.पापनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमशहरातील तेलगाव नाका, शाहू आयटीआयच्या जवळ असलेल्या अतिशय पुरातन श्री पापनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळी महारुद्राभिषेक, दिवसभर विविध कार्यक्रम होत आहेत. भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले आहे. मंदिराची विकासकामे सुरू असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडMahashivratriमहाशिवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रम