शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दरासाठी शेतक-यांचा माजलगावात रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:12 IST

माजलगाव शहरातील शिवाजी चौक येथे शेतक-यांनी एकत्र येत गुरुवारी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी आक्रमक झाल्यामुळे पोलीस प्रशासनाला आंदोलनकर्त्यांना अटक करण्याची वेळ आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शहरातील शिवाजी चौक येथे शेतक-यांनी एकत्र येत गुरुवारी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी आक्रमक झाल्यामुळे पोलीस प्रशासनाला आंदोलनकर्त्यांना अटक करण्याची वेळ आली.

माजलगाव येथे अवघ्या २५ कि.मी. परिघामध्ये तीन कारखाने असून उसाचे प्रमाण देखील तितकेच आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होऊन महिना उलटला तरी कोणत्याही कारखान्याने अधिकृतरीत्या भाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे मागील महिन्यांपासून कारखान्यांविरुध्द शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी येथील तहसील कार्यालयात कारखाना प्रतिनिधी, शेतकरी आणि प्रशासकिय अधिकारी यांनी मिळून बैठक घेवून चर्चा घडवून आणली. मात्र यात देखील कसल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. शेतकºयांनी पुन्हा एकत्र येत येथील शिवाजी चौकात सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन केले.

आंदोलनात राजेंद्र होके, डॉ.उध्दव नाईकनवरे, अ‍ॅड. नारायण गोले, मुसद्दीक बाबा, धम्मानंद साळवे, नितीन नाईकनवरे, संग्राम थावरे, नारायण होके, नुमान चाऊस, शेख रशीद, लखन सावंत, रामचंद्र डोईजड, आत्माराम ढिसले, राजाभाऊ शेजूळ, डिगांबर सोळंके, अंकुश जाधव, उत्तम झाटे यांचेसह शेतकरी सहभागी झाले.